उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर, 6 ऑगस्टला होणार मतमोजणी

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर, 6 ऑगस्टला होणार मतमोजणी

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीची घोषणा बुधवारी करण्यात आली. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीची अधिसूचना 5 जुलैला काढली जाणार असून 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 6 ऑगस्टरोजी होणार मतमोजणी.

२० जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, २२ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ६ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. लोकसभा व राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेतात. या निवडणुकीत नामनिर्देशित सदस्यही सहभागी होतात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

राष्ट्रपतीपदासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य करतात मतदान –

या प्रक्रियेत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित असतात. या निवडणुकीत प्रत्येक सदस्याला एकच मत देता येईल. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांसोबत आमदारही मतदान करतात, परंतु उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनाच मतदान करता येते.

First Published on: June 30, 2022 11:33 AM
Exit mobile version