Bihar Election : बिहार निवडणुकांचं बिगुल वाजलं; ३ टप्प्यांत मतदान, १० नोव्हेंबरला मतमोजणी!

Bihar Election : बिहार निवडणुकांचं बिगुल वाजलं; ३ टप्प्यांत मतदान, १० नोव्हेंबरला मतमोजणी!

गेल्या महिन्याभरापासून ज्या मुद्द्यावर बिहार आणि दिल्लीतलं देखील वातावरण तापू लागलं होतं, त्या बिहार निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं आहे. बिहारमध्ये तारखेला मतदान होणार आहे. एकूण ३ टप्प्यांत हे मतदान होणार असून १० नोव्हेंबरला तारखेला मतमोजणी होणार असल्याची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली होती. या पहिल्या टप्प्यासाठी २८ ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यासाठी ३ नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यासाठी ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजप, राजद, लोजपा अशा बिहारच्या राजकारणातील प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून ऐन कोरोनाच्या संकटात बिहारमध्ये निवडणूक प्रचाराची धूम उठणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू असताना बिहारमध्ये कशा पद्धतीने प्रचार होणार? हा देशात उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या निवडणुकीत प्रत्यक्ष प्रचारापेक्षा ऑनलाईन प्रचाराचा जास्त वापर केला जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात १६, दुसऱ्या टप्प्यात १७, तिसऱ्या टप्प्यात १५ जिल्ह्यांत निवडणुका होणार असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं.

कोरोना काळात कशी होईल ही निवडणूक?

बिहारमधल्या विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. २४३ जागांसाठी बिहारमध्ये मतदान होणार असून कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना घेऊनच निवडणुका घेतल्या जातील, असं यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केलं. यावेळी प्रत्येत मतदान केंद्रावर गेल्या निवडणुकीत १५०० मतदार होते, ती संख्या कमी करून १ हजार करण्यात आली आहे. या निवडणुकीत एकूण ७.२९ कोटी मतदार मतदान करणार असून त्यामध्ये ३.८६ कोटी पुरूष, तर ३.०४ कोटी महिला मतदार आहेत.

First Published on: September 25, 2020 1:15 PM
Exit mobile version