भारतात उघडले गजराजासाठी विशेष रुग्णालय

भारतात उघडले गजराजासाठी विशेष रुग्णालय

(सौजन्य- mental floss)

प्राण्यांचा इलाज करण्यासाठी रुग्णालये देशभरात आहेत. पण आता गजराजाचा ईलाज करण्यासाठी भारतात पहिले रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारी या रुग्णालयाचे अधिकृत उद्धाटन करण्यात आले. आग्रा येथील चुरमुरा येथील गावामध्ये हे रुग्णालय उभारण्यात आले असून हत्तींचा संपूर्ण इलाज या ठिकाणी केला जाणार आहे. वाईल्ड लाईफ sos हॉस्पिटल असे या रुग्णालयाचे नाव असून सगळ्या अत्याधुनिक इलाज पद्धती या रुग्णालयात हत्तींना उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.

काय आहेत रुग्णालयाची वैशिष्टये ?

रुग्णालय आग्रातील ताजमहाल परीसरात आहे. या ठिकाणी वायरलेस डिजीटल एक्स- रे, लेझर ट्रिटमेंट, डेंटल एक्स-रे, थर्मल इमेजिंक,अल्ट्रासोनोग्राफी,हायड्रोथेरपी या इलाज पद्धती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जखमी आणि आजारी हत्तींवर इलाज करणे सोपे जाणार आहे.

आग्रा येथील हत्ती संवर्धन केंद्र

लक्ष देणे होणार सोपे

रुग्णालयाच्या जवळच हत्तींचे संवर्धन केंद्र आहे. जेथे हत्तींची काळजी घेतली जाते. पण या ठिकाणी हत्तींची म्हणावी तशी काळजी घेता येत नाही. त्यांच्यावर योग्य इलाज होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन हे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. हत्तींचा इलाज करण्यासोबतच त्यांची ने- आण करण्यासाठी विशेष सोयी देखील करण्यात आल्या आहेत. हत्तींची पाहणी करण्यासाठी ऑब्झर्वेशन डेस्क देखील तयार करण्यात आले आहे. जेथून डॉक्टरांना सुरक्षित अंतरावरुन हत्तीच्या आरोग्यावर लक्ष ठेवता येणार आहे.

२०१० पासून संवर्धन केंद्र

हत्तींची काळजी घेण्यासाठी २०१० साली आग्रा येथे हत्तींसाठी संवर्धन केंद्र सुरु करण्यात आले. सध्या या संवर्धन केंद्रात २० हत्ती असून त्यांची काळजी घेतली जात आहे.

First Published on: November 17, 2018 4:21 PM
Exit mobile version