Twitterवरून पराग अग्रवाल यांना डच्चू मिळण्याची शक्यता?, एलन मस्कच्या एन्ट्रीनंतर युझर्सकडून वादाचे संकेत

Twitterवरून पराग अग्रवाल यांना डच्चू मिळण्याची शक्यता?, एलन मस्कच्या एन्ट्रीनंतर युझर्सकडून वादाचे संकेत

एलन मस्कने मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरवर ९.२ निष्क्रीय स्टेक खरेदी केले आहेत. या खरेदीनंतर तो कंपनीचा सर्वात मोठा स्टेक होल्डर बनला आहे. एवढंच नाही तर कंपनीच्या बोर्डातही त्यांनी एन्ट्री घेतली आहे. मस्क ट्विटरच्या बोर्ड मेंबर्समध्ये सामील होणार आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनीही ही माहिती दिली आहे. एलन मस्क यांचा ट्विटर बोर्डात समावेश करण्यात आला आहे. यावेळी मस्कने ट्विटरच्या इतर बोर्ड मेंबर्समध्ये आणि पराग अग्रवाल यांच्यासोबत काम करण्याबाबतही त्यांनी म्हटले आहे.

जॅक डोर्सी यांनी असेही म्हटले आहे की, पराग आणि एलनची मिळून एक चांगली टीम बनू शकते. परंतु बरेच ट्विटर वापरकर्ते ते वेगळ्याच पद्धतीने घेत आहेत. व्हेरिफाय युझर्सकडून सतत प्रतिसाद मिळत आहे. युझर्सकडून अनेक प्रकारचे मीम्स शेअर केले जात आहेत. जे पराग अग्रवाल आणि एलन मस्क यांच्यात काहीही ठिक नसल्याचा इशारा या मिम्सच्या माध्यमातून दिसत आहे. परंतु या इशाऱ्याला मिम्सपर्यंत ठेवणं गरजेचं आहे. कारण याबाबत कोणत्याही माहितीचा ठोस पुरावा समोर आलेला नाहीये, असं जॅक डोर्सी म्हणाले.

काय म्हणाले पराग अग्रवाल?

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ५ मार्च रोजी ट्विट केलं. त्यानंतर ते म्हणाले की, आम्ही एलन मस्क यांचा आमच्या बोर्डात समावेश करत आहोत. हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. ट्विटरला अधिक मजबूत करण्यासाठी आम्हाला कोणतरी हवे आहे, असं पराग अग्रवाल म्हणाले.

युझर्सकडून मीम्सचा वर्षाव

@hollis4congress या ट्विटर युझर्सकडून एक मीम शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एलन मस्क बोर्ड सदस्यांसह ट्विटरमध्ये सुधार करण्यासाठी चर्चा करताना दिसत आहेत. या मीम्समध्ये पराग अग्रवालसह इतर बोर्ड सदस्य देखील उत्तर देत आहेत. परंतु मस्क त्यांचं म्हणणं पटलेलं दिसत नाहीये. त्यामुळे त्यांच्या बैठकीतून त्यांना हाकलून दिल्याचं मीम्स दिसत आहे.

First Published on: April 6, 2022 5:03 PM
Exit mobile version