Elon Musk Resign : एॅलोन मस्कचा एंडेव्हर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या पदावरून राजीनामा, नेमकं काय आहे कारण?

Elon Musk Resign : एॅलोन मस्कचा एंडेव्हर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या पदावरून राजीनामा, नेमकं काय आहे कारण?

टेस्लाचे संस्थापक एॅलोन मस्क यांनी हॉलिवूड समूह एंडेव्हर ग्रुप होल्डिंग्सच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. मस्क यांच्या संपत्तीमध्ये विल्यम मॉरिस टॅलेंट एजन्सी आणि अल्टीमेट फाइटिंग चॅम्पियनशिप यांचा समावेश आहे. हॉलीवूड रिपोर्टरच्या मते, कंपनीने एसईसीसोबत शेअर केलेल्या वार्षिक अहवालात एॅलोन मस्कच्या रवानगीची घोषणा करण्यात आली आहे. त्यांचा राजीनामा ३० जून २०२२ पासून लागू होणार आहे.

आम्ही एॅलोन मस्कचे आभार मानतो, ज्यामध्ये त्यांनी आमच्या दीर्घकालीन धोरण, क्रीडा आणि मनोरंजनाच्या भविष्यासाठी अर्थपूर्ण योगदान दिले आहे. मस्क यांची डिमांड खूप आहे. परंतु वेळही कमी आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या समर्थनाची प्रशंसा करतो. असं एंडेव्हरचे प्रवक्ते म्हणाले.

एॅलोन मस्क यांनी का दिला राजीनामा ?

एॅलोन मस्क यांनी राजीनामा का दिला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. कंपनीने नमूद केले की, मस्कने १२ मार्च रोजी राजीनामा देण्याचा संकेत दिला होता आणि तो कोणत्याही प्रकारच्या वादामुळे दिलेला नाहीये. टेस्ला व्यतिरिक्त, मस्क स्पेसएक्सचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य अभियंता देखील आहेत.

भारतात एन्ट्री करण्यासाठी टेस्लाचे संघर्ष

भारतात एन्ट्री करण्यासाठी टेस्लाचे संघर्ष सुरू आहेत. कंपनी आणि केंद्र सरकार यांच्यात योग्य समन्वय नाहीये. एॅलोन मस्क यांनी अनेकदा सांगितले आहे की, भारतात आयात होणाऱ्या लक्झरी कारवरील कर खूप जास्त आहे. वास्तविक, टेस्ला आपल्या कारवरील आयात शुल्क कमी करू इच्छित आहे, ज्यासाठी भारत सरकार तयार नाही.

एॅलोन मस्क यांनी काही वेळापूर्वी एका ट्विटर युजर्सला उत्तर देताना सांगितले होते की, टेस्लाला भारतात दाखल होण्यास विलंब होत आहे. कारण सरकारसोबत काही गोष्टी सेटल करण्यास वेळ लागत आहे. भारत सरकारला वाटतंय की, टेस्लाने भारतातच कारचे उत्पादन आणि विक्री करायला पाहिजे. परंतु दुसरीकडे पाहीले असता, टेस्लाला सुरुवातीच्या व्यवसायादरम्यान कार आयात आणि विक्री करायची आहे, असं मस्क यांचे म्हणणं आहे.


हेही वाचा : Earthquake in Japan: जपानमध्ये भूकंपाचे धक्के, चार जणांचा मृत्यू ; बुलेट ट्रेनही रुळावरून घसरली


 

First Published on: March 17, 2022 10:58 AM
Exit mobile version