Coronavirus – करोनामुळे जाऊ शकते तुमची नोकरी, कारण…

Coronavirus – करोनामुळे जाऊ शकते तुमची नोकरी, कारण…

करोना व्हायरसने जगभरात उच्छाद मांडला आहे. यामुळे केवळ भारताला नाही तर भारतासह अनेक देशांना आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. जर वेळीच करोनावर नियंत्रण मिळवलं नाही तर मोठ्या आर्थिक संकटात भारत देश सापडू शकतो. करोनातून भारत देश सावरेलही पण किमान सहा ते आठ वर्ष या देशाची आर्थिक घडी बसवायला लागणार आहेत. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. काटकसर म्हणून कर्मचारी कमी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विमान कंपन्या, पर्यटन, आतिथ्य, किरकोळ विक्री, वाहन उद्योगातील कंपन्यांना करोनाच्या कहराचा सर्वाधिक फटका बसला आहे. राष्ट्रीय- आंतराष्ट्रीय विमानाची उड्डाणेच बंद केल्यामुळे सिंगापूर एअरलाइन्स, एमिरेट्स आणि लुफ्तान्सा या हवाई सेवांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्यांची हमी दिली असली तरी स्वेच्छेने विनावेतन रजा घेण्यास सांगितले आहे.

सिंगापूर एअरलाईन्सने ९६ टक्क्यांनी कपात केली आहे. तसं परिपत्रकच सिंगापूर एअरलाईन्सने काढले आहे. या काळात कर्मचाऱ्यांना निवास भत्त्यासह, शिक्षण व वैद्यकीय खर्चाच्या भरपाईचा भत्ता सुरू ठेवण्याची हमी एअरलाईन्सने दिली आहे.

मजूरांवर आर्थिक संकट

देशभरात अनेक ठिकाणी घरांचे, इमारतींचे अनेक सार्वजमीक वाहतूकीचे बांधकाम सुरू होते. मात्र करोनाच्या काळात संचारबंदी लागू झाली आणि सध्या सुरू अशणारे काम बंद करण्यावाचून पर्याय उरला नाही. या बांधकामाच्या कामावर कामगारांची रोजची पुंडी अवलंबून असते. परडे बेसवर या कामगारांना काम मिळतात.

गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव असे पारंपरिकरीत्या घरखरेदीसाठी योग्य मानल्या जाणाऱ्या मुहूर्तावेळी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. मात्र यंदा करोनाचे सावट या क्षेत्रावर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर महसूल गमवावा लागणार आहे. परिणामी या परिणाम वेतन कमी करण्यावर किंवा कर्मचारी कमी करण्यावर होऊ शकतो.

First Published on: March 25, 2020 7:47 AM
Exit mobile version