कुपवाड्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कुपवाड्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडच्या धमतरी गावात चकमक

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे चकमक झाली. बाबागुंड गावामध्ये रात्रभर चकमक सुरु होती या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दरम्यान, परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरु आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा बदला घेत पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. तसंच जम्मू-काश्मीरच्या काही भागात लपून बसलेले दहशतवादी जवानांवर गोळीबार करत आहेत.

अशी झाली चकमक

लष्कर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबागुंड गावामध्ये दोन ते तीन दहशतवादी लपून बसले होते. मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. लपून बसलेल्या दहतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. रात्री १ वाजल्यापासून चकमकीला सुरुवात झाली. त्यानंतर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. सीआरपीफ, जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त मोहिमेत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. ठार केलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही.

आधीच्या चकमकीत ५ जणांचा खात्मा

२७ फेब्रुवारीला शोपियां जिल्ह्यातील मामंडर येथे जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी दहशतवाद्यांच्याविरोधत मोहिम सुरु केली. २४ फेब्रुवारीला कुलवामाच्या तुरिगाम भागामध्ये चकमक झाली. या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होते. हे तिन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे होते. या चकमकीत डीएसपी अमित ठाकूर शहीद झाले होते.

३५ पाकिस्तानी दहशवतादी सक्रीय

पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी ऑपरेशन ६० सुरु केले. जवानांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास ६० दहशतवादी सक्रीय आहेत. यामधील जवळपास ३५ दहशतवादी पाकिस्तानी आहेत. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड गाजी राशिदला मारल्यानंतर जवानांनी सुरु केलेल्या मोहिमेत आता जैश-ए-मोहम्मदचा एक एक दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. जैश-ए- मोहम्मदच्या अहमद डारने पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला सीआरपीएफ जवानांच्या बसवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

First Published on: March 1, 2019 9:05 AM
Exit mobile version