रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ, ईडीने बजावली नोटीस

रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ, ईडीने बजावली नोटीस

रॉबर्ट वड्रा

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर सक्तवसुली संचलनालय अर्थात इडीने आपल्या कामाचा वेग वाढवला आहे. ईडीने सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रांना दिल्ली, बिकानेर आणि इतर ठिकाणच्या जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपांची चौकशी करण्यासाठी उद्या दिनांक ३० रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

असे आहे प्रकरण?

रॉबर्ट वाड्रांवर शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दलालाकडून लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप २००९ मध्ये करण्यात आला आहे. या खरेदी केलेल्या घराचा पत्ता १२, एलरटन हाउस, ब्रायनस्टन स्क्वेअर, लंडन असा देण्यात आला आहे.

रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचे सहाय्यक मनोज अरोरांकडून पाठवण्याच आलेल्या मेलमध्ये आर्थिक देवाण-घेवाण तसेच लंडनमधील असणाऱ्या घराच्या नुतनीकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. यासाठी १९ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. ऑक्टोबर २००९ मध्ये हा व्यवहार करण्यात आला असून जून २०१० मध्ये त्याची विक्री करण्यात आली. हे सर्व आरोप रॉबर्ट वाड्रांच्या वकीलांनी फेटाळून लावले असून सर्व आरोप तथ्यहिन असल्याचे सांगितले आहे.

First Published on: May 29, 2019 9:35 AM
Exit mobile version