Work From Home चा दबाव सहन न झाल्याने इंजिनिअर तरूणाची आत्महत्या!

Work From Home चा दबाव सहन न झाल्याने इंजिनिअर तरूणाची आत्महत्या!

प्रातिनिधीक फोटो

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू होता. दरम्यान यावेळी प्रशासनाकडून घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. तर काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला होता. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वांवरच घरुन काम करण्याची वेळ आली. मात्र वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिल्याने घरुन काम करताना योग्य सुविधा नसल्याने अनेकांना मानसिक तणाव जाणवत असल्याचेही दिसले. याच तणावातून एका ३२ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना गुजरातमध्ये ही घडली आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअर असणाऱ्या या व्यक्तीने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरुन काम करताना येणारा दबाव सहन न झाल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

वर्क फ्रॉम होमचा तणाव सहन न झाल्याने तरूणाने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. या तरूणाचे वय ३२ वर्ष असून जिगर गांधी असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिगरचा डिसेंबर महिन्यात साखरपुडा होणार होता. नोएडा येथील एका कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून तो काम करत होता. दोन महिन्यांपूर्वी तो घरी परतला होता आणि घरुनच काम करत होता. जिगर गेल्या काही दिवसांपासून घरून काम करावं लागत असल्याने किती तणाव असतो याबद्दल सांगत होता अशी माहिती त्याच्या कुटुंबाने पोलिसांना दिली आहे. शवविच्छेदन अहलावात गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


Good News: लवकरच येणार कोरोनाची लस; डिसेंबरपर्यंत Moderna लसीला मिळणार मंजूरी

First Published on: October 21, 2020 3:35 PM
Exit mobile version