इशा गुप्ताने स्वातंत्र्यदिनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

इशा गुप्ताने स्वातंत्र्यदिनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

इशा गुप्ता

देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येक देशवासिय वेगवेगळ्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. तर सोशल मीडियावर देखील शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. अशातच अभिनेत्री इशा गुप्ता हिने स्वातंत्र्यदिनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाए‘, असे ट्विट इशाने केले आहे. तिच्या या ट्विटवरुन संतप्त नेटकऱ्यांनी तिला चांगलेच फैलावर घेतले आहे.

हेही वाचा – राखीने शेअर केले हॉट हनिमून फोटो


नेटकऱ्यांनी इशाला धरले धारेवर

मिस इंडियाचा किताब जिंकलेल्या इशाला सामान्य ज्ञानसुद्धा नाही, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करत तिला धारेवर धरले आहे. तर तिच्या ट्विटवर अनेकांनी तिला होळी आणि दिवाळीच्या उपरोधिक शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

 

ट्रोल झाल्यावर ती म्हणाली…

ट्रोल झाल्यानंतर इशाने ते ट्विट डिलीट केले आहे आणि ती म्हणाली की, माझे अकाऊंट हॅक झाले होते. काही वेळानंतर तिने अकाऊंट पूर्ववत झाल्याची माहिती दिली आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत म्हणाली, ‘जिचे वडील हवाई दलात आहेत तिला तुम्ही स्वातंत्र्यदिन कधी आहे हे सांगत आहात. ट्रोलर्सना इतका का ऊत आला आहे?’, असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.


पहा : Video: लडाखमध्ये स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष


 

First Published on: August 15, 2019 4:40 PM
Exit mobile version