अयोध्येत राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना

अयोध्येत राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना

राम मंदिर

अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला असून लवकरच राम मंदिराची निर्मिती सुरू होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत जाहीर केले. या ट्रस्टकडे राम मंदिराच्या निर्मितीसाठी ६७ एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार आहे. तसेच हा ट्रस्ट स्वायत्तपणे काम करणार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

भारताच्या ऑक्सिजनमध्ये, आदर्शांमध्ये आणि मर्यादांमध्ये भगवान श्रीराम आहेत.अयोध्येचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे आपण सर्वजण जाणतोच, असे सांगत अयोध्येत भगवान श्रीराम यांच्या भव्य आणि दिव्य मंदिराच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. वर्तमान आणि भविष्यात रामलल्लाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या आणि त्यांची श्रद्धा पाहूनच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

बुधवारी सकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राम मंदिर निर्माणाबाबतचा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. माझ्या सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, श्रीराम जन्मस्थळावर भव्य आणि दिव्य असे राम मंदिर उभारण्याबाबत एक विशाल योजना तयार केली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, एका स्वायत्त ट्रस्ट असलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राची स्थापना करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

First Published on: February 6, 2020 5:48 AM
Exit mobile version