माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचे ८२ व्या वर्षी निधन

माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचे ८२ व्या वर्षी निधन

माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. देशाचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी देखील जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे जसवंत सिंह यांनी देशाची कायम सेवा केली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काय म्हणजे राजनाथ सिंह आपल्या ट्विटमध्ये
जसवंत सिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजपाला बळकट करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या परिवार व समर्थकांच्या बरोबर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट

“जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत मोदींनी ट्वटिमध्ये म्हटले की, जसवंत सिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.”

First Published on: September 27, 2020 9:39 AM
Exit mobile version