एक्झिट पोल जाहीर; वाचा कुणाची होणार एक्झिट!

एक्झिट पोल जाहीर; वाचा कुणाची होणार एक्झिट!

भारतीय संसद भवन

गेल्या जवळपास दीड महिन्यापासून देशभरात सुरु असलेलं प्रचाराचं आणि आरोप-प्रत्यारोपांचं रणकंदन अखेर क्लायमॅक्सला येऊन ठेपलं आहे. आज रविवारी शेवटच्या सातव्या टप्प्याचं मतदान बरोबर ६ वाजता संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले. भाजपच्या बहुमताच्या दाव्यांना काही प्रमाणात आव्हान देणारे आकडे एक्झिट पोलमधून जाहीर झाले असताना विरोधक आणि तिसऱ्या आघाडीला नवं स्फुरण चढलं आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेवढे म्हणून शक्य असतील, तेवढ्या पक्षांना गोळा करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी यंदाचे निकाल काहीसा चिंतेचा विषय ठरू शकतात. कारण अमित शहा यांच्या दाव्यानुसार भाजप पूर्ण बहुमताची अपेक्षा ठेऊन आहे, मात्र, एक्झिट पोलमध्ये स्थानिक पक्ष आणि विरोधकांना मोठ्या संख्येनं मतदारांनी कौल दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरू शकते.
A view of the sea
Pravin Wadnere

सी-व्होटरचा महाराष्ट्रातला सर्व्हे

भाजप – १९

शिवसेना – १५

काँग्रेस – ८

राष्ट्रवादी – ६

इतर – ०

Pravin Wadnere

टाईम्स नाऊने महाराष्ट्रासंदर्भात केलेल्या सर्वेनुसार…

  • भाजप-शिवसेना युतीला – ३८ जागा
  • काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी – १० जागा तर
  • इतर पक्ष आणि अपक्षांना – ० जागा मिळतील

असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Pravin Wadnere

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि अमित शाह यांच्यामध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर तिथल्या परिस्थितीवर सगळ्यांचंच लक्ष आहे. तिथे भाजपला १६, तृणमूल काँग्रेसला २४ तर इतर २ असं पक्षीय बलाबल असण्याची शक्यता नेल्सनने वर्तवली आहे.

Pravin Wadnere

सी व्होटरने दिलेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. गेल्या निवडणुकांमध्ये भाजपला ७३ जागा मिळाल्या होत्या त्या या वेळी ३८वर येऊ शकतात. तर काँग्रेसला फक्त २ जागा आणि सपा-बसपा आघाडीला ४० जागांवर विजय मिळू शकतो.

Pravin Wadnere

एनडीटीव्हीच्या पोल्स ऑफ पोलने दिलेल्या एक्झिट पोलनुसार…

  • भाजपप्रणीत एनडीएला – २९६ जागा
  • काँग्रेसप्रणीत युपीएला – १२६ जागा तर
  • इतर पक्ष आणि अपक्षांना – १२० जागा मिळतील

असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

First Published on: May 19, 2019 6:49 PM
Exit mobile version