एक्झिट पोल जाहीर; वाचा कुणाची होणार एक्झिट!

एक्झिट पोल जाहीर; वाचा कुणाची होणार एक्झिट!

भारतीय संसद भवन

गेल्या जवळपास दीड महिन्यापासून देशभरात सुरु असलेलं प्रचाराचं आणि आरोप-प्रत्यारोपांचं रणकंदन अखेर क्लायमॅक्सला येऊन ठेपलं आहे. आज रविवारी शेवटच्या सातव्या टप्प्याचं मतदान बरोबर ६ वाजता संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले. भाजपच्या बहुमताच्या दाव्यांना काही प्रमाणात आव्हान देणारे आकडे एक्झिट पोलमधून जाहीर झाले असताना विरोधक आणि तिसऱ्या आघाडीला नवं स्फुरण चढलं आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेवढे म्हणून शक्य असतील, तेवढ्या पक्षांना गोळा करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी यंदाचे निकाल काहीसा चिंतेचा विषय ठरू शकतात. कारण अमित शहा यांच्या दाव्यानुसार भाजप पूर्ण बहुमताची अपेक्षा ठेऊन आहे, मात्र, एक्झिट पोलमध्ये स्थानिक पक्ष आणि विरोधकांना मोठ्या संख्येनं मतदारांनी कौल दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरू शकते.
A view of the sea
Pravin Wadnere

दरम्यान, टाईम्स नाऊने केलेल्या आकडेवारीनुसार…

  • भाजपप्रणीत एनडीएला – ३०६ जागा
  • काँग्रेसप्रणीत युपीएला – १३२ जागा तर
  • इतर पक्ष आणि अपक्षांना – १०४ जागा मिळतील,

असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Pravin Wadnere

नेल्सनने भाजपला सर्वात धक्कादायक एक्झिट पोल दिला असून उत्तर प्रदेशमध्ये भाजपला तब्बल ५१ जागांचा फटका बसेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यामध्ये भाजपची २२ जागांवर घसरगुंडी उडणार असून सपा-बसपा थेट ५६ जागांवर पोहोचणार असल्याचं दिसत आहे. २०१४मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तर प्रदेशमध्येच भाजपला फटका बसणार असल्याचं या अंदाजात दिसत आहे.

First Published on: May 19, 2019 6:49 PM
Exit mobile version