कोरोनाचा नाश कधी होणार? शास्त्रज्ञ म्हणतात…

गोव्यात कोरोनाची चिंता वाढली; कोरोनाचा चौथा बळी!

कोरोना व्हायरसची आतापर्यंत लाखो लोकांना लागण झाली असून यामध्ये हजारो लोकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. तसेच या कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन देशील वाढवण्यात आले आहे. मात्र, सर्वांना एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे कोरोनाचा नाश कधी होणार? त्याच्यापासून आपली सुटका कधी होणार? यावर हार्वर्डच्या शास्त्रज्ञांनी उत्तर दिले असून त्यांनी केलेला अभ्यास सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोरोना व्हायरस हा भरपूर कालावधीसाठी राहणार आहे. कारण COVID – 19 हा मोसमी आजार आहे. जसे थंडीत लोकांना व्हायरल आजार होतात तसाच हा आजारही होईल. तसेच २००२ – ०३ सालच्या सार्स (SAARS) आजाराप्रमाणे एका लहरीसारखा कोरोना व्हायरसचा नाश होईल, याची शक्यता नाकरली आहे.

एकावेळीच लॉकडाऊन पुरेसा नाही

कोरोना व्हायरस भरपूर कालावधीसाठी राहतो. त्यामुळे एका वेळीच लॉकडाऊन पुरेसे नाही. २०२२ पर्यंत सोशल डिस्टंसिंगची गरज आहे, असेही ते पुढे म्हणाले आहेत. अमेरिकेतील कोरोना व्हायरसची परिस्थिती लक्षात घेत शास्त्रज्ञांनी असा सल्ला दिला आहे.

‘सध्या कोरोना व्हायरसवर कोणताही उपचार उपलब्ध नाही, त्यामुळे सोशाल डिस्टंसिंग व्हायरसपासून बचाव करण्याचा मार्ग आहे. एकाच वेळी जास्त लोक एकत्र आल्याने व्हायरस पसरण्याचा धोका जास्त आहे’, असे प्रमुख अभ्यासक स्टिफन किस्लर यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना सांगितले.

…यानंतर नियम शिथील करता येतील

कोरोना व्हायरसवर उपचार आणि लस उपलब्ध झाल्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी आणि कठोर नियम शिथील करता येऊ शकतात. तसेच अद्याप या व्हायरसची रहस्य समोर आलेली नाहीत. विशेष म्हणजे हा व्हायरस एकदा होऊन गेल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती आणि शरीरात हा व्हायरस किती दिवस असतो हे समजलेले नाही. मात्र, या व्हायरसशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती अधिक असणे महत्त्वाचे आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.


हेही वाचा – लॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे ७-८ लाख कोटींचे नुकसान शक्य


 

First Published on: April 16, 2020 9:11 AM
Exit mobile version