फेसबुकची मोठी कारवाई; काँग्रेसचे ६८७ तर भाजपचे १५ पेजेस केले बंद

फेसबुकची मोठी कारवाई; काँग्रेसचे ६८७ तर भाजपचे १५ पेजेस केले बंद

(प्रातिनिधिक फोटो)

जगातील सगळ्यात मोठी सोशल मीडिया वेबसाईट असलेल्या फेसबुकने अशा प्रकारे एखाद्या राजकीय पक्षावर अशा प्रकारची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतात लोकसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक असताना फेसबुकने काँगेस पक्षाशी संबंधीत ६८७ पेजेस बंद केले आहेत. काही अग्राह्य मजकूर आणि फेक आकाउंट यूजर्स असल्याचे निदर्शनास आल्याने फेसबुकद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. भारतात फेसबुकचे जवळपास ३० कोटी युजर्स आहेत. फेसबुकचे सायबर सिक्युरिटी हेड नाथनेल ग्लेचियर यांनी या कारवाई विषयी सांगितले आहे.

भाजप विरोधी अपप्रचार

काही फेसबुक युजर्स हे खोटी अकाऊंट उघडून, वेगवेगळ्या ग्रुपला जोडले जाऊन लोकांशी संपर्क वाढवण्याचे काम करत होते. या ग्रुपमध्ये अॅड होऊन काही लोकल बातम्या व्यतिरीक्त राजकीय चर्चा, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी अपप्रचार केला जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच या पेजेस वरुन खोट्या बातम्या प्रसारीत केल्या जात होत्या. फेसबुकने यावर रिसर्च केले असता ही पेजेस काँगेस पक्षाच्या आयटी सेल विभागातील लोकांद्वारे चालवले जात असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, फेसबुकने उदाहरण म्हणून त्यासंबंधी दोन पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर टीका तर राहुल गांधी यांना समर्थन देण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

पाकिस्तानी सेनेचे १०३ आकाउंट हटवले

भारतातील काँग्रेस पक्षाशी संबंधीत ६८७ पेजेस सोबत पाकिस्तानी जनसंपर्क विभागाशी संबंधीत १०३ पेजेस देखील हटवण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील सुरक्षेशी संबंधित अनेक संस्थानी फेसबुकला राजकीय फायद्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेक अकाऊंटवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, या प्रकरणी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी सदर पेजेस नक्की काँग्रेसचे आहेत का? हे पडताळून पाहणे गरजेचे असल्याचे सांगितले.

First Published on: April 1, 2019 6:11 PM
Exit mobile version