निवडणुकीदरम्यान फेसबुकने सुरु केले ‘हे’ दोन नवीन फिचर्स

निवडणुकीदरम्यान फेसबुकने सुरु केले ‘हे’ दोन नवीन फिचर्स

प्रातिनिधिक फोटो

देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. निवडणुकीच्या सुमारास सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे सोशल मीडियाला निवडणुकीदरम्यान खूप महत्व आहे. निडणुकीच्या काळात वाढता सोशल मीडियाचा वापर बघून फेसबुकने काही फिचर्स सुरु केले आहेत. निडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे फिचर्स सुरु करण्यात आले आहेत. कँडिडेट कनेक्ट असे या फिचर्सचे नाव आहे. या फिचर्समुळे उमेदावर मतदाराशी प्रत्यक्ष संवाद साधू शकणार आहे. या फिचर्स बाबत फेसबुकचे निर्देशक समिध चक्रवर्ती यांनी माहिती दिली आहे. याचा फायदा उमेदवारांना नक्की होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. हे फिचर्स १२ भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. ११ एप्रिल पासून हे फिचर्स सुरु करण्यात येते.

फेक अकाऊट विरोधात फेसबुकने सुरु केली मोहीम

निवडणुकीच्या काळात उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी अनेक फेक अकाऊंट सुरु केले जातात. या फेक अकाऊंट्सला नष्ट करण्याचे काम फेसबुकने सुरु केले आहे. फेक अकाऊंटवरून खोटी माहिती पसरवण्याचे काम होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. यासाठी फेसबुकने दिल्ली येथे एका वॉर रुमची स्थापना केली आहे. निवडणुदरम्यान कोणत्याही खोट्या बातम्या पसरू नये यासाठी या वॉररुमची स्थापना करण्यात आली आहे.

First Published on: March 27, 2019 3:38 PM
Exit mobile version