Whatsapp, FB आणि इन्स्टाग्राम मेसेजिंग अचानक ठप्प! कारण अस्पष्ट

Whatsapp, FB आणि इन्स्टाग्राम मेसेजिंग अचानक ठप्प! कारण अस्पष्ट

जगभरात सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरकर्ते असलेले सोशल मिडिया अ‌ॅप्लिकेशन व्हॉट्सअ‌ॅपवर अचानक मेसेज जाणं बंद झाल्याने वापरकर्ते अर्थात युजर्स हैराण झाले. व्हाट्सअप्प नंतर फेसबुकसह इन्स्टाग्राम मेसेजिंग अ‌ॅप्लिकेशनद्वारे सवांद साधता येईल यासाठी युजर्सनी त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन मेसेज केले मात्र त्या अ‌ॅप्लिकेशनचा वापर करताना तीच समस्या जाणवत असल्याने व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम मॅसेजिंग अ‌ॅप्लिकेशन डाऊन झालं असल्याचे लक्षात आले. व्हॉट्सअ‌ॅपद्वारे व्हाईस मेसेजिंग, व्हिडीओ शेअरिंग ग्रुप चॅट हे सर्वकाही अचानकपणे ठप्प झाल्याचे दिसले. व्हॉट्सअ‌ॅपच्या सगळ्या सेवा अचानक बंद झाल्यामुळे ट्विटरवर एकच खळबळ उडाली आहे. काही क्षणात whatsapp down हा ट्रेण्ड ट्विटरवर सुरु देखील झाला. मात्र व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक बंद होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलंनाही. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे व्हॉट्सअ‌ॅप मेसेजिंगला अडचण येत असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हर बंद पडल्यामुळे व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम मेसेजिंग अ‌ॅप्लिकेशनच्या सगळ्या सुविधा ठप्प झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार साधारण शुक्रवारी रात्री 11.15 च्या सुमारास समोर आल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्डची क्षणार्धात चर्चा सुरु झाली. एवढ्या मोठ्या काळासाठी व्हॉट्सअ‌ॅप बंद पडण्याची ही पहिलीच घटना असल्याचेही सांगितले जात आहे.

First Published on: March 19, 2021 11:59 PM
Exit mobile version