FACT CHECK: श्रमिकांसाठी पुन्हा सुरु होणार स्पेशल ट्रेन?

FACT CHECK: श्रमिकांसाठी पुन्हा सुरु होणार स्पेशल ट्रेन?

FACT CHECK:श्रमिकांसाठी पुन्हा सुरु होणार स्पेशल ट्रेन?

देशात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यात कोरोनाचे सर्वाधिक रग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात लवकरचं लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनच्या भीतीने इतर राज्यातील स्थलांतरीत मजुरांनी पुन्हा आपल्या घरची वाट धरली. दरम्यान या स्थलांतरीत मजुरांसाठी भारतीय रेल्वेने विशेष श्रमिक ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु हे व्हायरल मेसज खोटे असल्याचे सांगत भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाने अधिकृत माहिती जाहिर केली आहे.

यावर मध्य रेल्वेने(Central Railway)स्पष्टीकरण देत सांगितले की, श्रमिक रेल्वे चालवण्याची कोणताही योजना तयार करण्यात आलेली नाही. याबाबतची माहिती मध्य रेल्वेने(Central Railway)आपल्या अधिकृत ट्विटरवरून दिली आहे. या ट्विटमध्ये मध्य रेल्वेने स्पष्ट केले की, श्रमिक ट्रेन सुरु करण्याबाबत सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवली जात आहे. कोणताही श्रमिक ट्रेन चालवली जाणार नाही किंवा चालवण्याबाबत रेल्वेची कोणताही योजना नाही. त्यामुळे प्रवाशांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे.

तसेच मध्य रेल्वेने(Central Railway)ट्विटमध्ये असेही लिहिले की, आपल्या इतरांच्या सुरक्षेसाठी कोरोना नियमांचे पालन करा, तसेच विश्वसनीय माहितीसाठी @Central_Railway या ट्विटरपेजला फॉलो करा व http://cr.indianrailways.gov.in वर जा. दरम्यान महाराष्ट्रात गेल्या वर्षी वाढत्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊनदरम्यान अनेक स्थलांतरित मजुरांच्या सेवेसाठी विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. रेल्वेने १ मे २०२० मध्ये अनेक श्रमिक ट्रेन चालू करत लॉकडाऊनमध्ये हजारो मजुरांना तसेच दुसऱ्या राज्यात अडकलेल्या प्रवाशी मजुरांना आपल्या राज्यात सोडले.


 

First Published on: April 12, 2021 11:37 AM
Exit mobile version