कोरोनाचे नवे व्हेरिएंट येतच राहणार ! ‘यूएन’ प्रमुखांचा इशारा

कोरोनाचे नवे व्हेरिएंट येतच राहणार ! ‘यूएन’ प्रमुखांचा इशारा

कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्था अत्यंत कमकुवत झाली आहे. कोरोना महामारीचा सामना समानतेने आणि निष्पक्षतेने केला जावा. जोपर्यंत जगातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्यात आपल्याला यश येत नाही, तोपर्यंत कोरोनाचे नवे व्हेरिएंट येतच राहतील, असा इशारा संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दिला. तसेच हे व्हेरिएंट सातत्याने लोकांचे जीवन आणि अर्थव्यवस्था ठप्प करत राहतील, असेही गुटेरेस म्हणाले.

संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ऑनलाईन दावोस अजेंडा २०२२ शिखर परिषदेला संबोधित करताना म्हणाले की, ‘ज्यावेळेस जगातील कमी उत्पन्न असलेल्या देशांना त्यांची सर्वात जास्त गरज होती, त्यावेळी जागतिक आर्थिक प्रणाली त्या देशांची मदत करण्यास यशस्वी ठरली. जग महामारीतून पुनरुज्जीवित होत आहे, पण ते खूपच कमकुवत आहेत. काही देशांमध्ये लसीकरणाचा दर आफ्रिकन देशांपेक्षा (7 टक्के) अधिक आहे.’

तसेच गुटेरेस पुढे म्हणाले की, ‘सध्या कमी उत्पन्न असलेले देश कमजोर स्थितीमध्ये आहेत. खाद्य वस्तूंवरील वाढणारी किंमत यामुळे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये पुनरुज्जीवनावर परिणाम होत आहे. जेव्हा या देशांना सर्वाधिक मदतीची गरज होती, तेव्हा जागतिक आर्थिक प्रणाली मदत करण्यास यशस्वी ठरेल.’

दरम्यान सध्या जगातील काही देशांमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगाने लसीकरण सुरू आहे. मात्र, काही देशांमध्ये लसीकरण होण्याचे प्रमाण फार कमी आहे. आणि अशाच देशांमधून कोरोनाचे नवे व्हेरिएंट पसरत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेत कोरोना लसीकरणाचे प्रमाण खूप कमी आहे.

First Published on: January 19, 2022 4:45 AM
Exit mobile version