कोरोनाने नातं संपवलं! बरे झालेल्या रूग्णांना नातेवाईकांनी नाकारलं!

कोरोनाने नातं संपवलं! बरे झालेल्या रूग्णांना नातेवाईकांनी नाकारलं!

राज्यात वाढत जाणाऱ्या कोरोनामुळे दिवसेंदिवस हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. पण हॉस्पिटलमधील कोरोना रूग्णांना आपण कधी बरे होतेय आणि कधी एकदा घरी जातोय असं होतं. त्याचबळावर ते कोरोनाव्हायरसशी दोनहात करतात. अखेर कोरोनाव्हायरशी त्यांनी लढा जिंकला. आता आपण आपल्या घरी पुन्हा असं वाटत असताना घडतं मात्र उलटतच .

मात्र या कोरोनाने नाती दुरावली आहेत असच म्हणावं लागेल. कोरोना रूग्ण बरे झाल्यावर घरच्यांची आशेने वाट बघत असतात. मात्र कुणीच येत नाही. अशी परिस्थिती सध्या हैदराबादच्या गांधी रुग्णालयातील अनेक कोरोना रुग्णांची आहे. ज्यांनी कोरोनाव्हायरसला तर हरवलं मात्र कुटुंबाने त्यांना नाकारलं. पुर्ण बरे होऊनही या रूग्णांवर हॉस्पिटलमध्येच राहण्याची वेळ आली आहे. ५० पेक्षा अधिक कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना कुटुंबाने स्विकारलं नाही म्हणून हॉस्पिटलमध्येच राहण्याची वेळ आली आहे.

अनेक जण डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालयाच्या गेटवर आपल्या नातेवाईकांची वाट पाहून थकले आणि पुन्हा रुग्णालयात आले. आता जायचं तरी कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे ते पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. दहा ते पंधरा दिवस उपचार घेऊन बरे झाल्यानंतर या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालय प्रशासनाकडून या रुग्णांच्या कुटुंबाला वारंवार फोन केले जात आहेत. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही.

काही रुग्णांच्या कुटुंबांनी त्यांना घरी नेण्यापूर्वी टेस्ट रिपोर्ट नेगेटिव्ह आहे ते दाखवा अशी मागणी केल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं. मात्र आयसीएमआरच्या गाइडलाइन्सनुसार लक्षणं नसलेले आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांची लक्षणंही पूर्णपणे बरी झाली, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली तर डिस्चार्जपूर्वी त्यांच्या टेस्ट करण्याची गरज नाही.

आता या रुग्णांपैकी वयस्कर रुग्णांना रुग्णालयातच राहण्यासाठी बेड्स देण्यात आलेत आणि काही जणांना नेचर क्युर हॉस्पिटल ज्याचं क्वारंटाइन सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे, तिथं पाठवण्यात आलं आहे.


हे ही वाचा –

First Published on: June 26, 2020 3:39 PM
Exit mobile version