मेथीची भाजी सांगून खाऊ घातला गांजा; कुटुंब रुग्णालयात दाखल

मेथीची भाजी सांगून खाऊ घातला गांजा; कुटुंब रुग्णालयात दाखल

प्रातिनिधीक फोटो

उत्तर प्रदेशमधील कन्नौज जिल्ह्यात एका कुटुंबातील ६ सदस्य रुग्णालयात दाखल झाले आहेत. कारण या कुंटुबातील लोकांनी मेथीची भाजी समजून चक्क गांजाची पाने शिजवून खाल्ली. मेथीच्या भाजी खात असल्याचे कुटुंबाला वाटले. मात्र प्रकृती बिघडल्यानंतर शेजार्‍यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सर्व आजारी लोकांना रुग्णालयात दाखल केले. गांजा देण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक देखील केली.

उत्तर प्रदेशमधील कन्नौज जिल्ह्यातील कोतवाली परिसरातील मियागंज गावात ही घटना घडली. आरोपींनी मेथीच्या जागी पीडितेच्या कुटूंबाची चेष्टा करण्यासाठी हा प्रकार घडवून आणला असल्याचे सांगण्यात येत आहे.

ओम प्रकाश नावाच्या कुटूंबाला गावातील नवल किशोर या व्यक्तीने गांजा दिला होता. गणेश ओम प्रकाश यांचा मुलगा नितेश यांनी तो मेथीची भाजी समजून घेतला. नवल याने नितेशला सांगितले की, ती सुकी मेथी आहे. घरी घेऊन मेथीची ताजी भाजी बनव. नितेशने त्या गांज्याला मेथी समजून घरी आणले आणि घरात दिले. घरातील मंडळींनी सुखी मेथी समजून त्याची भाजी बनवली. यानंतर कुंटुबातील ओम प्रकाश, नितेश, मनोज, कमलेश, पिंकी आणि आरती हे सदस्य भाजी खाल्ल्यानंतर आजारी पडले. यानंतर या सर्वांचीच तब्येत अधिकच खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले.

यानंतर ओम प्रकाशच्या कुटूंबातील एकाने शेजार्‍यांना पोलिसांना याविषयी माहिती दिली, यावेळी ती भाजी खाऊन सर्व लोक बेशुद्ध झाले. शेजार्‍यांच्या माहितीवरून पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी या प्रकरणाचा तपास घेतला आहे. पोलिसांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी कढईमध्ये असलेली भाजी आणि उरलेला गांजा आपल्या ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी नवल किशोरला ताब्यात घेतले. नवल किशोरने पोलिसांना सांगितले की, त्याने थट्टा-मस्करी करण्याच्या नादात हा प्रकार केला होता. यावेळी त्याने केलेल्या चुकीची कबुली पोलिसांना दिली.


आईसोबत झालेल्या भांडणातून चिमुरड्याची हत्या, शेजारीणीला अटक
First Published on: July 1, 2020 4:22 PM
Exit mobile version