उद्धव यांच्याबरोबर अयोध्याला जाऊन मशिद उभारणार – फरहान आजमी

उद्धव यांच्याबरोबर अयोध्याला जाऊन मशिद उभारणार – फरहान आजमी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येला जाण्याच्या निर्णयावर समाजवादी पक्षाचे नेते अबु आजमी यांचे पुत्र फरहान आजमी यांनी आक्षेप घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस झाल्यानंतर अयोध्येला जाणार असे सांगून मुस्लीम जनतेला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप फरहान यांनी केला आहे. तसेच जर उद्ध्व ठाकरे अयोध्येला राम मंदीरासाठी जाणार असतील तर आम्ही पण मशिद बांधण्यासाठी जाऊ असे फरहान यांनी म्हटले आहे.

नागरिकता सुधारणा कायदा ( सीएए) विरोधात २७ जानेवारीला मुंबईत काढण्यात आलेल्या एका रॅलित फरहान यांनी हे विधान केले आहे. जर उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर मी पण जाणार. आपण सगळेच जाऊ. मी तर महाविकास आघाडीच्या सर्वच नेतेमंडळींना आमंत्रित करतोय. माझे वडील पण येतील. उद्धव ठाकरे राम मंदीर उभारण्यासाठी जात आहेत. तर आम्ही मशिद बांधण्यासाठी जाणार. असे फरहान म्हणाले असून सर्वैाच्च न्यायालयाच्या निर्णयावर आम्ही नाराज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय हा मुस्लीम बांधवांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आहे. पण जगभरात मुस्लीमांची लोकसंख्या २. ५ अरब एवढी आहे. यात ५० हून अधिक मुस्लीम देश आहेत. जे आनंदाने आम्हांला त्यांच्या देशात प्रवेश देतील. पण आम्हांलाच जायचे नाहीये. असेही फरहान रॅलित म्हणाले.

First Published on: January 30, 2020 12:43 PM
Exit mobile version