संताप! वडिल-आजीने मिळून केली तान्हुलीची हत्या; चौथ्यांदा मुलगी झाल्याने काढला राग

संताप! वडिल-आजीने मिळून केली तान्हुलीची हत्या; चौथ्यांदा मुलगी झाल्याने काढला राग

कोरोनाच्या संशयामुळे गरोदर महिलेला मारहाण, बाळाचा गेला जीव

आपल्या देशात मुलीला लक्ष्मी, दुर्गा, सरस्वतीचे रुप मानले जाते. जिथे मुलींच्या जन्माचे स्वागत वाजत-गाजत केले जाते. तिथे अशाही काही घटना आजही घडत आहेत. ज्यामुळे कोणाचाही राग अनावर होऊ शकेल. ही घटना चेन्नईमधील एका ४ दिवसाच्या चिमुकलीसंबंधीत आहे. जिला फक्त मुलगी म्हणून जन्माला आल्याने आपल्या वडिलांनीच जीवे मारून टाकले आहे. अतिशय धक्कादायक ही घटना असून चेन्नईच्या मधुराई येथील कोझावंधन येथे राहणाऱ्या थवमणी आणि चित्रा यांच्या मुलीसोबत घडली आहे. थवमणी आणि चित्रा यांनी चौथ्यांदा मुलगी जन्माला आली असल्याने बाळाचे वडिल आणि आजीनेच चार दिवसाच्या बाळाची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

काय आहे प्रकरण

गेल्या आठवड्यात चित्राने मुलीला जन्म दिला. काही दिवसांपूर्वी कुटुंबियांनी त्या नवजात बाळाचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची बतावणी केली. मात्र शेजाऱ्यांना तिच्या मृत्यूबाबत शंका येऊ लागली. त्यांनी ही बाब पोलिसांना सांगितली. जिल्ह्या पोलीस आणि मेडिकल टीम थवमणीच्या घरी दाखल झाले. सर्व बाबींची तपासणी केल्यानंतर बाळाचा मृत्यू हा विष दिल्यामुळे झाला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. बाळाचे वडिल थवमणी आणि आजी पंडियम्मल यांना पोलिसांनी अटक केली असून दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. बाळाच्या आईच्या अपरोक्ष हा गुन्हा घडल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींवर कलम २०१ आणि कलम ३०२ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

कोरोनाविरोधात एकट्या महापालिकेनेच लढायचे का? केंद्र, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना कामाला जुंपवा!

First Published on: May 18, 2020 10:31 PM
Exit mobile version