जेएनयू कार्यकर्त्यां सेहला रशीद विरोधात गुन्हा दाखल

जेएनयू कार्यकर्त्यां सेहला रशीद विरोधात गुन्हा दाखल

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कार्यकर्त्यां सेहला रशीद

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय जनतेत संतापाची लाट आहे. या हल्ल्यात काही काश्मीरी नागरिकाचा समावेश असल्याची माहिती समोर येत होती. यामुळे देशातील काश्मीरी सुरक्षित नसल्याचे वक्तव्य जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कार्यकर्त्यां सेहला रशीद यांनी केले होते. देहरादून येथे एका वस्तीगृहात १५ ते २० काश्मीरी मुली अडकल्या असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली होती. या मुलींना मारण्यासाठी लोकांचा जमाव आला असून पोलिसांनी यामध्ये कोणती मदत केली नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. ही गर्दी अत्यंत रागात असून या मुलींचे काही बरे वाईट होईल असा संक्षय तिने ट्विटरवरून व्यक्त केला होता. पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारतीय आता काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ले करत असल्याचे तिने सांगितले होते. मात्र त्यांनी शेअर केलेली माहिती ही फक्त अफवा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाच्या काही वेळे नंतर रशीद विरोधात अफवा पसवण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांवर खोटो गुन्हे दाखल

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कार्यकर्त्यां सेहला रशीद या काश्मीरच्या असून त्यांनी सांगितले, की देशभरात काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले करण्यात येत आहेत, त्यांना शिवीगाळ करून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे त्यांनी सांगितले होते. “उत्तराखंड पोलिसांनी माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे. मात्र बजरंग दलचे विकास वर्मा विरोधात कोणतीही कारवाई केली नाही.”  – सेहला रशीद

First Published on: February 19, 2019 11:21 AM
Exit mobile version