आईशी घोषवर पोलिसांनी केला एफआयआर दाखल

आईशी घोषवर पोलिसांनी केला एफआयआर दाखल

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोषवर दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. चार जानेवारीला विद्यापीठातील सर्व्हर रूमची तोडफोड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या आरोपात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. आईशी घोषबरोबर आणखी १९ जणांविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

जेआनयूमध्ये पी वाढी विरोधात आंदोलन जेएनयू विद्यार्थी संघटनेने पुकारले होते. या आंदोलनाचा भाग म्हणून सबमिशन्स, परिक्षांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानंतर चार जानेवारी विद्यापीठाच्या सर्व्हर रुमची तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड जेएनयू विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप होता. पाच जानेवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाने ह्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. अखेर आज पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोषसह १९ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

त्याचबरोबर रविवारी ५ जानेवारीला रात्री अज्ञातांनी वसतीगृहावर हल्ला केला. या हल्ल्यात प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनााही मारहाण करण्यात आली. आईशी घोषच्या डोक्यावर रॉडने हल्ला केला. यात ती रक्तबंबाळ झाली होती. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. ठिकठिकाणी विद्यार्थी-युवकांनी आंदोलने सुरू केली. मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून गेट वे ऑफ इंडियाजवळ विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

First Published on: January 7, 2020 1:37 PM
Exit mobile version