FIRE : भोपाळमध्ये आग विझवण्यासाठी पोहोचले लष्कर, हवाईदल; मुख्यमंत्र्यांनी मागितली मदत

FIRE : भोपाळमध्ये आग विझवण्यासाठी पोहोचले लष्कर, हवाईदल; मुख्यमंत्र्यांनी मागितली मदत

 

मध्य प्रदेशः भोपाळ येथील सातपुडा या सरकारी इमारतीला भीषण आग लागली आहे. स्थानिक अग्निशमन दल ही आग विझवण्यात अपयशी ठरले आहे. आग विझवण्यासाठी लष्कराला बोलवण्यात आले होते. तरीही आग आटोक्यात न आल्याने आता हवाई दलाची मदत घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी संरक्षण दलाकडे आग विझवण्यासाठी मदत मागितली.

सातपुडा भवनाच्या तिसच्या मजल्यावर सुरुवातीला आग लागली होती. एसीमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तिसऱ्या मजल्यावर लागलेली आगी हळूहळू संपूर्ण इमारतीत पसरली. इमारत खाली करण्यात आली आहे. आगीत महत्त्वाची कागदपत्रे आणि फर्निचर जळून खाक झाले आहे.

आगीची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले. मात्र आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे लष्कराला आग विझवण्यासाठी बोलवण्यात आले. आगीने रौद्ररुप धारण केल्याने लष्करालाही आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. अखेर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संरक्षण मंत्रालयाशी संपर्क करुन हवाई दलाची मदत मागितली आहे. त्यानुसार रात्री हवाई दल घटनास्थळी जाणार आहे.

 

धारावीतील शमा इमारतीला भीषण आग

मुंबईतील धारावी येथील ९० फिट मार्गावर असलेल्या शमा या सातमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. रविवारी सकाळी 10:58 वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. या आगीच्या घटनेत 32 जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी शर्तीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. (Dharavi Fire Fire breaks out at Shama building in Dharavi 32 people injured) मिळालेल्या माहितीनुसार, शमा इमारतीला लागलेल्या आगीत 32 जण जखमी झाली आहे. या 32 जणांपैकी 29 जणांना महापालिकेच्या सायन रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच, उर्वरित तिघांना धारावीतील आयुष रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी रुग्णांवरील उपचारांनंतर सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलिसांनी आगीत अडकलेल्या इमारतीतील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अखेल स्थानिक पोलीस, नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या प्रयत्नानंतर अखेर 12:30 वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळण्यात अग्निशमन दलाला यश आले.

अंबरनाथ आग दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू

मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या अंबरनाथमधील आय.टी.आय.सर्कल जवळ ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये नायट्रिक ऍसिडच्या टँकला आग लागली होती. शनिवारी लागलेल्या आगीमध्ये एका कामगाराचा मृत्यू तर ४ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आगीवर ताबा मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

 

First Published on: June 12, 2023 11:22 PM
Exit mobile version