राजस्थानमध्ये सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग; १५० सिलेंडरचा स्फोट

राजस्थानमध्ये सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग; १५० सिलेंडरचा स्फोट

राजस्थानमध्ये सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग

राजस्थानमध्ये सिलेंड घेऊन जाण्याऱ्या ट्रकला अचानक आग लागली. या आगीमध्ये ट्रकमधील सिलेंडरचा एकापाठोपाठ स्फोट झाला. ही घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सांडेराव भागामध्ये घडली आहे. या स्फोटामुळे झालेल्या आवाजाने सांडेराव परिसर पूर्णता हदरला. ही घटना गावापासून दूर घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६२ वर केनपुरा गावापासून काही अंतरावर रविवारी सकाळी ही घटना घडली. गॅस सिंलेडरला घेऊन जाणारा ट्रक सुमेरपूरच्या दिशेने जात होता. ट्रकमध्ये १५० घरगुती गॅस सिलेंजर होते. केनपूरा गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर ट्रकचा टायर फुटला आणि त्यामध्ये आग लागली. ट्रक चालकाने आणि क्लीनरने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. आगीने रौद्ररुप धारण केले. ट्रकला भीषण आग लागली. ट्रक चालक आणि क्लीनर लांब गेले आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

ट्रकमधील सर्व सिलेंडरचा स्फोट

काही वेळातच ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट व्हायला सुरुवात झाली. एकामागे एक सिलेंडरचा स्फोट होऊ लागला. सिलेंडर स्फोटाच्या आवाजामुळे आसपासचा परिसर हादरुन निघाला. अपघाताची माहिती मिळताच सांडेराव आणि गुंडा एंदला पोलीस स्टेशनचे पोलीस अग्निशमन दलाच्या टीमसोबत घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीवर नियंत्रण मिळवणे कठिण होते कारण सिलेंडरचा स्फोट सुरुच होता. या आगीमध्ये ट्रकमधील सर्व सिलेंडरचा स्फोट झाला.

हेही वाचा – 

पिंपरी-चिंचवडमध्ये गोदामाला भीषण आग; १७ दुकानं जळून खाक

First Published on: June 9, 2019 10:00 PM
Exit mobile version