कोलकाताच्या बगरी मार्केटमध्ये अग्नितांडव!

कोलकाताच्या बगरी मार्केटमध्ये अग्नितांडव!

कोलकताच्या बगरी मार्केटमध्ये भीषण आग (फोटो सौजन्य-The Hindu)

पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातील ‘बगरी मार्केट’मधील एका इमारतील शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. दरम्यान या आगीचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे तसंच आजूबाजूला उंच इमारतींचा वेढा असल्यामुळे, आग आटोक्यात येण्यास विलंब होतो आहे. दरम्यान घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या ३० गाड्या दाखल झाल्या असून अाग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त अद्याप समोर आलेले नाही. मात्र, ही आग ज्या परिसरात लागली आहे तिथे अधिक लोकवस्ती असल्यामुळे सर्वत्र भीतीचे सावट पसरले आहे. उपलब्ध माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री २:४५ च्या सुमारास ही आग लागली. दरम्यान विजेची ठिणगी पडून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

वाचा : मनोहर पर्रीकरांना द्यायचाय राजीनामा ?

दरम्यान बगरी मार्केट परिसरात लागलेल्या या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नसले तरी या आगीमध्ये खूप मोठी वित्तहानी झाल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच कोलकाताच्या हावडा रेल्वे स्थानकात गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली होती. हावडा स्थानकातील इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याकारणाने ही आग लागली होती. या घटनेतही सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नव्हती.
First Published on: September 16, 2018 10:50 AM
Exit mobile version