गाजियाबादमध्ये भाजप आमदारावर प्राणघातक हल्ला

गाजियाबादमध्ये भाजप आमदारावर प्राणघातक हल्ला

भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्यार प्राणघातक हल्ला

भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडलीय. नंदकिशोर गुर्जर गाजियाबादच्या लोनी विधानसभेचे आमदार आहेत. रविवारी रात्री बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान नंदकिशोर यांच्या गाडीमध्ये असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी या हल्लेखोरांना प्रत्युत्तर करत गाडी पोलीस स्टेशनपर्यंत सुरक्षितरित्या आणली. या हल्ल्यामध्ये आमदार नंदकिशोर यांना कोणतिही दुखापत झाली नाही.

सुदैवाने नंदकिशोर गुर्जर वाचले!

भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर रविवारी मवाना येथे झालेल्या आरएसएसच्या बैठकिसाठी गेले होते. ही बैठक आटपून परत येत असताना रात्री त्यांच्यावर गोळीबार झाला. दोन बाईकवरुन आलेल्या चार हल्लेखोरांनी आमदार नंदकिशोर यांची गाडी अडवली आणि त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. नंदकिशोर यांनी गाडीमध्ये खाली लपून आपला जीव वाचवला. काही दिवसांपूर्वीच नंदकिशोर यांनी आपला जीव धोक्यात असल्याचे सांगितले होते. त्यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती. मात्र त्यांना अतिरिक्त सुरक्षा मिळाली नव्हती.

हल्लेखोरांचा तपास सुरु

हल्ल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. हल्लेखोरांचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी टीम तयार करुन सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. अद्याप तरी हल्लेखोरांना अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

First Published on: June 18, 2018 2:44 PM
Exit mobile version