राष्ट्रपतीच्या पत्नीचा कोरोनाविरोधात लढा; स्वत:च्या हातानी शिवतात मास्क

राष्ट्रपतीच्या पत्नीचा कोरोनाविरोधात लढा; स्वत:च्या हातानी शिवतात मास्क

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या विषाणूशी संपूर्ण देश एकजुटीने लढत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा याकरता, ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. तसेच या कोरोनाशी लढा देण्याकरता प्रत्येक व्यक्ती मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे. कोणी गरीब आणि गरजू लोकांना मोफत अन्नधान्य, औषध, मास्क पुरवत आहेत. तर अनेक लहान मुले देखील आपल्या खाऊचे पैसे सहायत निधीसाठी दान करत आहेत. दरम्यान, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पत्नीनेही कोरोनाविरुद्ध लढ्यात सहभाग घेतला आहे, त्यांनी स्वत:च्या हाताने मास्क बनवण्यास सुरुवात केली आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी राष्ट्रपती भवनातील ‘शक्ती हात’ परिसरातील दिल्लीतील शेल्टर होमसाठी मास्क शिवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पदाचा कोणताही मान – सन्मान न बाळगता सविता कोविंद या एका सामान्य गृहिणीप्रमाणे शिवणयंत्रावर मास्क शिवण्याचे काम करत आहेत. ANI वृत्तसंस्थेने कोविंद यांचा मास्क शिवतानाचा फोटो प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही आपल्या एका महिन्याचा पगार कोरोनाविरुद्ध लढ्यात पंतप्रधान सहायता निधीला मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

तर सविता कोविंद बनवत असलेल्या मास्कचे सर्वांकडून सोशल मीडियावर कौतुक देखील केले जात आहे.

 

दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही. अजूनही या विषाणूवर ठोस औषध मिळाले नसल्यामुळे सर्व वैद्यकीय यंत्रणा या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.


हेही वाचा – मास्क, सॅनिटायझरवरील जीएसटी हटवा; सीटीआयची मागणी


 

First Published on: April 23, 2020 6:11 PM
Exit mobile version