दिल्ली दूर नहीं! देशातील सर्वांत लांब ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेचे आज उद्घाटन

दिल्ली दूर नहीं! देशातील सर्वांत लांब ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेचे आज उद्घाटन

Delhi Mumbai Expressway inauguration by PM Narendra Modi | नवी दिल्ली – दिल्ली-बडोदा-मुंबई या द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या लोकापर्णानंतर दिल्ली-दौसा-लालसोट मार्ग (Delhi-Dausa-lalsot) वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अवघ्या दोन तासांत २४६ किमीचा पल्ला पार करू शकणार आहेत. यामुळे आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

हेही वाचा – डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास

1,380 किमी लांबीचा आठ लेन असलेला दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग अनेक शहरांना लाभदायक ठरणार आहे. मार्च 2019 रोजी पायाभरणी करून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. तेव्हा अर्थ मंत्रालयाने घोषणा केली होती की हा एक्सप्रेसवे 101,420 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाने बांधला जाईल. तसंच, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग 1,386 किमीचा देशातील सर्वात लांब ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे बनेल. यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईमधील प्रवासाचे अंतर अवघ्या १२ तासांवर येणार आहे.

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जाणार आहे. तसंच, कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरतसारख्या मोठ्या शहरांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेमुळे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत या आर्थिक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि या भागांमध्ये आर्थिक समृद्धी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा प्रकल्प 93 PM गति शक्ती इकॉनॉमिक नोड्स, 13 बंदरे, आठ प्रमुख विमानतळ आणि आठ मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क (MMLP) आणि JNPT पोर्ट तसेच जेवार विमानतळ, नवी मुंबई विमानतळ यासारख्या नवीन आगामी ग्रीनफिल्ड विमानतळांना देखील सेवा देईल.

First Published on: February 12, 2023 8:10 AM
Exit mobile version