Dassault Rafale Aircraft: पहिलं राफेल भारताच्या ताफ्यात दाखल!

Dassault Rafale Aircraft: पहिलं राफेल भारताच्या ताफ्यात दाखल!

राफेल करार, त्यावरून झालेले आरोप-प्रत्यारोप, फ्रान्सचे अध्यक्ष होलँद यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परस्पर केलेलं बार्गेनिंग या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर ३६ राफेल लढाऊ विमानांपैकी पहिलं राफेल आज भारताच्या स्वाधीन झालं. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह स्वत: तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर असून राफेलच्या हस्तांतरणाच्या कार्यक्रमाला ते स्वत: हजर होते. इतर राफेल टप्प्याटप्प्याने भारताच्या हवाली करण्यात येणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दसऱ्याच्या मुहूर्तावर राफेल ताब्यात घेऊन तिथेच शस्त्रपूजन करणार आहेत.

‘२३ सप्टेंबर, २०१६ रोजी राफेल करार करण्यात आला होता. ऑगस्ट २०१७पासून भारताचं एक पथक राफेल विमानांच्या बांधणीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात आहे. फ्रान्सकडून नियोजित वेळापत्रकानुसार उरलेल्या राफेल विमानांचं हस्तांतरण वेळेत पूर्ण होईल, अशी मी अपेक्षा करतो’, अशी प्रतिक्रिया या कार्यक्रमावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी दिली.


हेही वाचा – राफेलचे सत्य काय?

राफेलची काही वैशिष्ट्ये!

First Published on: October 8, 2019 5:53 PM
Exit mobile version