सौदी अरेबियात महिला ‘अँकरने’, रचला इतिहास

सौदी अरेबियात महिला ‘अँकरने’, रचला इतिहास

सौदी अरेबियातील महिला अँकर- जुमान अल्शामी (सौजन्य-indiatimes)

वृत्तनिवेदन अर्थात न्यूज अँकरिंगच्या क्षेत्रात महिला निवेदिका अग्रस्थानी आहेत. जगभरातील न्यूज चॅनेलवर आपल्याला सर्रास महिला अँकर पाहायला मिळतात. मात्र, सौदी अरेबियासारख्या देशात जिथे अन्य देशांच्या तुलनेत महिलांना फारसं स्वातंत्र नाही, अशा देशात महिला अँकरने टीव्हीवर बातम्या देणं ही लक्षवेधी बाब आहे. त्यातही ती महिला रात्रीच्यावेळी बातम्या देत असेल तर गजबच. सौदी अरेबियातील एका महिला अँकरने असाच एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. सौदीमध्ये याआधी न्यूज चॅनेलवरील महिला अँकर केवळ सकाळच्या वेळेतच बातम्या देत असंत. मात्र, या महिला अँकरने चक्क रात्रीच्या न्यूज बुलेटिनमध्ये बातम्या देत एक नवा इतिहास रचला आहे. ‘सौदी टीव्ही’ या न्यूज चॅनेवरील महिला अँकरने रात्रीच्यावेळी बातम्या देत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.


Video: छोटसा ‘हाती’ बनला ‘साथी’

सौदी टीव्ही या न्यूज चॅनेलवर दररोज रात्री ९:३० वाजता एक न्यूज बुलेटिन प्रसारित केले जाते. याच बुलेटिनमध्ये एका पुरुष सहकाऱ्यासोबत या महिलेने बातम्या दिल्या. आतापर्यंत सौदीमध्ये रात्रीच्यावेळी बातम्या देणारी ही पहिली-वहिली महिला अँकर ठरल्याने, संपूर्ण जगात आणि विशेषत: सोशल मीडियामध्ये हा चर्चेचा विषय ठरतो आहे. सौदीमध्ये सहसा रात्रीच्यावेळी पुरुष अँकर गंभीर विषयांवरची बातमीपत्रं सादर करतात. तर सकाळच्या वेळी महिला अँकर हवामानचा आढावा, पाककला किंवा व्हायरल किस्से यासारख्या हलक्या-फुलक्या विषयांवरील बातम्या सादर करतात. मात्र, जुमान अल्शामी या महिलेने पहिल्यांदाच रात्रीच्यावेळी बातम्या दिल्यामुळे एक नावा विक्रम रचला गेला आहे. विशेष म्हणजे या प्रयोगानंतर आता महिलाही रात्रीच्या बातम्या देणार, अशी घोषणा न्यूज चॅनेलच्या ट्वीटर अकाउंटवरुन करण्यात आली आहे.


वाचा: संरक्षण मंत्रालयाकडून सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडिओ जारी

First Published on: September 27, 2018 3:42 PM
Exit mobile version