आंध्र प्रदेशमध्ये मासेच मासे

आंध्र प्रदेशमध्ये मासेच मासे

आंध्र प्रदेशमध्ये माशांचा पाऊस

आंध्र प्रदेशमध्ये सध्या माशांचा पाऊस कोसळला आहे. आंध्र प्रदेशच्या पूर्वेकडील गोदावरी जिल्ह्यातील अमलापूरम येथे पेथई चक्रीवादळाने थैमान घातले आहे. या चक्रीवादळाने सोमवारी चक्क माशांचा पाऊस कोसळला आहे. यावेळी आकाशातून जोरदार पावसोबत जिवंत मासेही जमिनीवर पडत दिसून येत आहेत. हे पाहून अमलापूरम वासियांची एकच धावपळ उडाली आहे.

आंध्र प्रदेशमध्ये माशांचा पाऊस

आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातील अमलापूरम येथे झालेल्या पावसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी माशांच्या पावसाचा व्हिडिओ अनेक जणांनी मोबाईल कॅमेऱ्यावर कैद केला आणि नंतर व्हॉट्सअॅपवर पोस्ट केला. व्हॉट्सअॅपवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आहे. त्यानंतर अनेकांना ही व्हिडिओ पाहिल्यानंतर अमलापूर येथे एकच गर्दी केली. या ठिकाणी आलेल्या अनेकांनी फुकटात मासे घेण्यासाठी आले होते. अमलापूरम येथे झालेल्या या पावसाला ‘गिडासलू’ असे देखील म्हणतात. तसेच माशांचा पाऊस पडण्याची ही जगातील पहिलीच घटना नाही. ज्या देशांमध्ये भयंकर चक्रीवादळ येतात तेथे मासे आणि बेडकांचा पाऊस पडणे ही सामान्य घटना आहे. तसेच पेथई चक्रीवादळं अनेकवेळा किनाऱ्यावर आलेले मासे आणि बेडकं आपल्याबरोबर वाहून नेतात आणि जमिनीवर फेकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

First Published on: December 18, 2018 2:32 PM
Exit mobile version