सावधान! कोरोनापेक्षा मोठी ५ संकटं पृथ्वीवर येणार आहेत, नासाने दिले संकेत!

सावधान! कोरोनापेक्षा मोठी ५ संकटं पृथ्वीवर येणार आहेत, नासाने दिले संकेत!

पृथ्वीवर येत आहेत उल्का

कोरोनानंतर अनेक संकंट पृथ्वीच्या दिशेने येत आहे. या संकटांची माहिती नासानं दिली आहे. नासानं दिलेल्या माहितीनुसार येत्या २-३ दिवसात पृथ्वीच्या दिशेनं ५ उल्का येणार आहेत. पण काही काळजी करण्याची गरज नाही, कारण या सर्व उल्का पृथ्वीपासून ४६.५ मैलांपेक्षा कमी अंतरावरून जातील.

पृथ्वीवरील दिशेने वेगाने येणाऱ्या प्रत्येक उल्केवर लक्ष ठेवून आहेत. नासाची सेंट्री सिस्टम आधीपासूनच अशा संकटांवर कायम लक्ष ठेवून असतात. आणि पुढच्या १०० वर्षात अशा २२ उल्का येणार असल्याचा इशाराही दिला आहे.यातील काही उल्का पृथ्वीवर आदळण्याचीही शक्यता आहे. नासानं दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा एक मोठी उल्का 6 जून रोजी पृथ्वीच्या दिशेनं आली होती. नासानं या उल्काचं नाव रॉक-163348 (2002 NN4) असे ठेवण्यात आले होते. याची लांबी 250 से 570 मीटर होती.

यातील पहिल्या दोन उल्का Asteroid 2013XA22 (३१० फूट, १८ दशलक्ष मैल दूर) आणि Asteroid 2020KZ3 (६४ फूट, ७ दशलक्ष ६१ हजार मैल दूर) या मंगळवारी रात्री जवळून गेल्या आहेत. या दोघांमुळेही कोणतीही हानी झालेली नाही. तर बुधवारी ६५ फूट उल्का ३६ लाख मैलांवरून जाईल. तर ११ जूनला ६० फूट लांब उल्का जाणार आहे.


हे ही वाचा – फेसबुकवरच्या प्रेमाची लॉकडाऊन लव्ह स्टोरी, लग्नाचा किस्सा तर नक्की वाचा!


 

First Published on: June 10, 2020 11:00 PM
Exit mobile version