झारखंडमध्ये नक्षलवादी हल्ला; ५ पोलीस कर्मचारी शहीद

झारखंडमध्ये नक्षलवादी हल्ला; ५ पोलीस कर्मचारी शहीद

गडचिरोलीमध्ये नक्षलवादी हल्ला

झारखंडच्या सरायकेला येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. सरायकेला या भागात पोलीस पथक शोध मोहिम राबवून परतत असताना या पथकावर लक्षलवाद्यांनी हल्ला केला असून शहीद झालेल्या जवानांचे हत्यार घेऊन नक्षलवाद्यांनी हल्लानंतर पलायन केले आहे.

दोन एएसआय आणि तीन शिपायांचा समावेश

सरायकेला येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. ज्यामध्ये दोन एएसआय आणि तीन शिपायांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या सरायकेला जिल्ह्यातील तिरुलडीह पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस पथक शोध मोहीमेवरून परतत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. आधीपासूनच सापळा रचून आणि दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवान सावध नसताना हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात काही नक्षलवादी देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: June 14, 2019 8:50 PM
Exit mobile version