Flipkart women’s Day: स्मार्टफोनवर भरघोस सूट

Flipkart women’s Day: स्मार्टफोनवर भरघोस सूट

ऑनलाईन ई-कॉमर्स कंपनी Flipkart नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर्स लागू करत असते. याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं अवचित्य साधत कंपनीने ‘Flipkart Women’s Day Sale’ आयोजित केली आहे. हा बंपर सेल ७ आणि ८ मार्च या दोन दिवसांसाठीच असेल. या विशेष सेलमध्ये ग्राहकांना Poco F1, Honor 9N, Samsung Galaxy S8, Nokia 6.1 Plus सह बऱ्याच लेटेस्ट स्मार्टफोन्सवर भरघोस सूट मिळणार आहे. यामध्ये काही कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर थेट ८० ट्क्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. याशिवाय लॅपटॉप्स, हेडफोन्स, स्पीकर्स, डिजिटल कॅमेरा आदी गॅजेट्सवरही Women’s Day Sale अंतर्गत आकर्षक सूट देण्यात आली आहे. एक नजर टाकूया या सेलमध्ये देण्यात आलेल्या ऑफर्सवर :

स्मार्टफोन्स वरील ऑफर्स

‘Honor 9N’ हा १२ हजारांचा फोन तुम्ही सेलमध्ये केवळ ९,९९९ रुपयांत खरेदी करू शकता.
Nokia 6.1 Plus (मूळ किंमत – १५,४९९) | ऑफर प्राईस – १३,९९९ रु.
Vivo V9 Pro (मूळ किंमत – १५,९९०) | ऑफर प्राईस – १३, ९९० रु.
याशिवाय अन्य काही मिड आणि प्रिमिअम बजेट रेंजच्या स्मार्टफोन्सवरही सूट देण्यात आली आहे.
Samsung Galaxy S8 | ऑफर प्राईस – ३०, ९९० रु.
Realme 2 चा 4GB चा फोन | ऑफर प्राईस – ९,४९९ रु.
Motorola One Power | ऑफर प्राईस – १३,९९९ रु.
Asus Zenfone Lite L1 | ऑफर प्राईस – ४,९९९ रु.
याशिवाय Vivo V9 Pro  फोनवरही १,५०० रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.


अन्य गॅजेट्सवरील ऑफर्स 

या सेलमध्ये तुम्ही १२,९९० किंमतीपासून सुरु होणारे लॅपटॉप खरेदी करु शकणार आहात.
हेडफोन्स आणि स्पीकर्सवर मूळ किंमतीमध्ये ७० टक्के सूट देण्यात आली आहे.
याशिवाय टॅबलेटची किंमत २,९९९ रुपयांपासून सुरु होत आहे.
टेलिव्हिजन सेटवरही ७५ टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.
सेलदरम्यान प्रत्येक एका तासाला तुम्हाला OMG तर दर ८ तासांनी BLOCK BUSTER डील्स आणि ऑफर्स मिळत राहतील.
अनेक बँकांच्या क्रेड्ट आणि डेबिट कार्डवर तसंच ईएआय सुविधेवरही लाभदायक ऑफर्स जारी करण्यात आल्या आहेत.
First Published on: March 7, 2019 9:01 AM
Exit mobile version