ऑनलाईन सुनावणी दरम्यान आरोपी न्यायाधीशाला असं काही बोलला की… तुम्हीही व्हाल हैराण

ऑनलाईन सुनावणी दरम्यान आरोपी न्यायाधीशाला असं काही बोलला की… तुम्हीही व्हाल हैराण

ऑनलाईन सुनावणी दरम्यान आरोपी न्यायाधीळाला असं काही बोलला... तुम्हीही व्हाल हैराण

प्लोरिडामध्ये एका व्यक्तीवर चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या आरोपीला गुरुवारी न्यायाधिशांच्या समोर हजर करण्यात आले. परंतु आरोपीने न्यायाधिशांसमोर असे काही केली ही तुम्हीही ऐकून हैराण व्हाल. फोर्ट लॉडरडेल नाम व्यक्तीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपीखाली आरोपी डेमेट्रियस लेविसला अटक करण्यात आली आहे. यावेळी त्या घरात फोर्ट लॉडरडेल यांची तीन मुलं झोपली होती. याप्रकरणी आरोपी लेविसची झूम या ऑनलाईन माध्यातून सुनावणी सुरु होती. यावेळी आरोपीला महिला न्यायाधीश तबीथा ब्लॅकमून यांच्या समोर ऑनलाईन हजर करण्यात आले. यावेळी जूम कॉलवर येताच आरोपी लेविस न्यायाधिशांना असे काही बोलला की कोर्टाची सुनावणी पाहणाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. याच सुनावणी दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.
आरोपी लेविसने न्यायाधिशांना पाहताच विचारले की ‘तुम्ही कशा आहात? त्यानंतर तो स्क्रीनवर पाहत म्हणाला की, जज तुम्ही खुप सुंदर दिसता. इथवरचं तो थांबला नाही तर चक्क न्यायाधीश ब्लॅकमून यांना भर लाईव्ह केसमध्ये ‘मी तुमच्यावर प्रेम करतो’ अशा शब्दात प्रपोज केला.

या संपूर्ण प्रकारवर न्यायाधीश ब्लॅकमून यांना थोडावेळ काय बोलावे सुचलेच नाही व त्या हसल्या. यानंतर त्यांनी वकिली भाषेत उत्तर देत ‘ठीक आहे मिस्टर लुईस! तुमचा हा लाळघोटेपणा सगळीकडे कामी येत असेल परंतु याठिकाणी तो खपवून घेतला जाणार नाही.’ या संपूर्ण प्रकारावर महिला न्यायाधीशाने आरोपीची चांगलीच कानउघडनी केली. व त्याला ५,००० डॉलर भरण्याची शिक्षा सुनावली. आरोपी लेविसने याआधी ही चार वेळा जेलची हवा खाल्ली आहे. २०१९ मध्येच त्याची सुटका झाली होती. परंतु याप्रकरणात आपली लाळघोडेपणा करुन सुटका होईल असे वाटले परंतु lतसे झाले नाही. या ऑनलाईन सुनावणी दरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान गाजत आहे. यावर एका युझरने प्रतिक्रिया देत लिहिले की, या आरोपीकडे आता हरवण्यासारखे राहिलेचं काय आहे? तर दुसऱ्या एका युझर्सने लिहिले की, तू पूर्ण प्रयत्न केलासं पण शॉट मिस झाला. काहींनी वकिल ब्लॅकमून यांच्या सुंदरतेवर आरोपी लेविसने केल्या वक्तव्याचे समर्थन केले.

First Published on: February 8, 2021 3:10 PM
Exit mobile version