कोरोनामुळे बेवारशी कुत्र्यांना मिळाले हक्काचे घर- पाहा व्हिडीओ

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून अनेकांचा बळी घेतला आहे. यामुळे सगळ जगचं ठप्प झालं आहे. मात्र याच कोरोनामुळे दक्षिण फ्लोरिडातील बेवारशी कुत्र्यांना हक्काचे घर मिळाल्याची सुखद घटना घडली आहे. यामुळे कुत्रेच नाही तर बेवारस प्राण्यांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेने कोरोनाच्या नकारात्मक वातावरणातही मोठा जल्लोष साजरा केला.

दक्षिण फ्लोरिडातील पाम बीच कौंटी अॅनिमल केअर अँड कंट्रोल ही सरकारी संस्था आहे. या संस्थेत बेवारशी व मोकाट प्राण्यांचा सांभांळ केला जातो. कुत्रा, मांजर, माकड, घोडा, गाढव यासारखे अनेक प्राण्यांचा ही संस्था सांभाळ करते. अनेकजण य़ेथून प्राणी दत्तकही घेतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोणीही या प्राण्यांकडे फिरकले नाही. पण भटक्या कुत्र्यांची संख्या मात्र वाढत गेली. त्यातच कोरोनाचे महासंकट उभे राहील्याने या प्राण्यांचा सांभाळ करण्याचे आव्हान संस्थेसमोर उभे राहीले. यामुळे संस्थेने  कोरोनापासून बचाव करण्यासाठी या प्राण्यांना दत्तक घेण्याचे आवाहन लोकांना केले. दरम्यान लॉकडाऊन असल्याने सगळा देशच घरी आहे. यामुळे या प्राण्यांचा सांभाळ करणे शकय असल्याने अनेक प्राणीमित्रांनी संस्थेकडे कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी रांगाच लावल्या. त्यानंतर चार दिवसांतच संस्थेतील सर्व कुत्र्यांना हक्काचे घर मिळाले. अशी घटना संस्थेच्या इ्तिहासात पहील्यांदाच घडल्याने संस्थेतील कर्मचाऱ्यांनी आनंदाश्रू व्यक्त करत रिकाम्या पिंजऱ्यांसमोर उभे राहत कुत्र्यांना प्रेमाने निरोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी प्राणी मित्रांनी दाखवलेल्या औदार्याचे कौतुक केले आहे.

First Published on: April 18, 2020 4:13 PM
Exit mobile version