निर्मला सीतारामण यांचे पतीच म्हणतात, आर्थिक मंदीला मोदी सरकार जबाबदार

निर्मला सीतारामण यांचे पतीच म्हणतात, आर्थिक मंदीला मोदी सरकार जबाबदार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे पती पराकला प्रभाकर

अर्थशास्त्रज्ञ आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे पती पराकला प्रभाकर यांनी देशातील आर्थिक मंदीवर आपले मत व्यक्त केले आहे. नवीन धोरण तयार करण्यासाठी मोदी सरकार इच्छाशक्ती दाखवत नसल्याचा आरोप त्यांनी केला. द हिंदू या वर्तमानपत्रात लिहिलेल्या सदरात प्रभाकर म्हणतात की, भाजपने माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंह यांचे आर्थिक मॉडेल घेतले पाहीजे. नेहरूंच्या समजावादावर टीका करत बसण्यापेक्षा अर्थव्यवस्थेचे उदारीकरण केले पाहीजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.

सरकार सध्या नकारात्मक विचार करत असल्याचाही आरोप प्रभाकर यांनी केला आहे. एकामागून एक सेक्टरमध्ये आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत आहे. सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आर्थिक परिस्थिती गंभीर बनत चालल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रभाकर पुढे म्हणतात की, “भाजप सरकारने स्वतःची ‘निती’ ठरविण्यापेक्षा ‘नेती, नेती (Not this Not This)’ प्राधान्य दिलेले आहे. नेहरुंच्या धोरणावर टीका करण्याव्यतिरीक्त भाजपकडून आणखी काहीही होताना दिसत नाही. भाजपच्या चाणक्यांकडून होणारी ही टीका केवळ राजकीयदृष्ट्या असून त्यातून अर्थव्यवस्थेबद्दल चकार शब्दही काढला जात नाही आहे.”

First Published on: October 14, 2019 3:01 PM
Exit mobile version