भारतामध्ये सलग दुसर्‍या दिवशी ३० हजार कोविड रूग्णांची नोंद

भारतामध्ये सलग दुसर्‍या दिवशी ३० हजार कोविड रूग्णांची नोंद

दोन दिवसांपासून भारतामध्ये दररोज जवळपास ३० हजार कोरोना बाधित नवीन रूग्णांची नोंद होत आहे. २४ तासांमध्ये कोरोनाचे नवीन २९ हजार १६३ रूग्ण आढळले. सलग १० दिवसांपासून देशामध्ये दररोज ५० हजारांपेक्षा कमी कोरोनाचे रूग्ण नोंदवले जात आहेत.

कोविड होऊ नये म्हणून नागरिक आता काळजी घेत आहेत. नागरिकांकडून योग्य वर्तन करण्यात येत आहे. यूरोप आणि अमेरिका या देशांमध्ये काही दिवसांमध्ये कोविडच्या दैनंदिन रूग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मात्र भारतामध्ये परिस्थिती उलट आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. कोविड आजारातून बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. २४ तासांमध्ये ४० हजार ७९१ कोरोनाचे रूग्ण बरे झाले. तर गेल्या २४ तासांमध्ये २९ हजार १६३ जणांना कोविड झाल्याची नोंद आहे. सरकारने संपूर्ण देशभर कोविड चाचण्या करण्याचे प्रमाण कायम ठेवले आहे. एका दिवसात देशामध्ये १२ लाख ६५ हजार ९०७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येमध्ये ७.०१ टक्के घट झाली आहे.

देशामध्ये ४ लाख ५३ हजार ४०१ कोविडचे सक्रिय रूग्ण आहेत. एकूण रूग्णांपैकी हे प्रमाण फक्त ५.११ टक्के आहे. या आजारातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या ८२ लाख ९० हजार ३७० आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता वाढले असून ते ९३.४२ टक्के झाले आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण केरळमध्ये सर्वाधिक आहे. केरळमधील ६,५६७ कोरोना रूग्ण आता पूर्ण बरे झाल्याची नोंद आहे. त्याखालोखाल पश्चिम बंगालमधील ४,३७६ कोरोनाचे रूग्ण बरे झाले आहेत. तर दिल्लीमधील ३,५६० कोरोनाचे रूग्ण बरे झाले आहेत.

First Published on: November 17, 2020 5:51 PM
Exit mobile version