‘भारत! नको रे बाबा’, परदेशी खेळाडूंना भारत नकोसा

‘भारत! नको रे बाबा’, परदेशी खेळाडूंना भारत नकोसा

परदेशी महिला खेळाडूंचा भारताला नकार (फोटो प्रातिनिधीक आहे)

एकीकडे देशात महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे देशात बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत. हे सगळे पाहता भारत दौरा नको रे बाबा! अशी प्रतिक्रिया सध्या परदेशी महिला खेळांडूच्या पालकांनी दिली आहे. चेन्नईमध्ये सध्या स्विस स्क्वॉश स्पर्धा सुरु आहे. इतकी मोठी स्पर्धा असून देखील या खेळासाठी भारतात येणे महिला खेळाडूंनी टाळले आहे. त्यामुळे जगासमोर पुन्हा एकदा देशाचे नाव कापले गेले आहे.

मोठ्या खेळाडूंची दांडी

स्क्वॉशसाठी अनेक देशाने यंदा दांडी मारली. विशेषत: स्विर्त्झलंडच्या चांगल्या खेळाडूंची ही अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. या खेळाडूंशी या संदर्भात अधिक चर्चा केल्यानंतर त्यांनी भारतात येण्याची भिती वाटते असे सांगितले.

वाचा- चेन्नईमध्ये अल्पवयीन मुलीवर २२ जणांनी केला बलात्कार

एकटे पाठविण्यास वाटते भिती

चेन्नईत काही दिवसांपूर्वी एका ११ वर्षाच्या मुलीवर १७ जणांनी लैंगिक अत्याचार केला. शिवाय अनेक परदेशी मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटना टीव्हीवर पाहिल्यानंतर खेळाडूंच्या पालकांनी मुलींना भारतात पाठवण्यास नकार दिला आहे, अशी प्रतिक्रिया स्विर्त्झलंडची आघाडीची खेळाडू अँब्रे अॅलिंक्स हिच्या पालकांनी दिली आहे. तर इराक आणि ऑस्ट्रेलियामधून स्पर्धेसाठी आलेल्या महिला खेळाडूंच्या पालकांनी त्यांना त्यांच्या टीमसोबत राहण्याचाच सल्ला दिला आहे.

नेमकं चेन्नईत काय घडलं?

चेन्नईतील अयानवरम भागामध्ये रहाणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीवर २२ जणांनी ७ महिने बलात्कार केला आहे. पीडित मुलीवर बलात्कार करणाऱ्यांबद्दल ऐकले तर सगळ्यांना धक्का बसेल. ती ज्या बिल्डिंगमध्ये राहते त्या ठिकाणी काम करणाऱ्या नराधमांनीच तिला शिकार बनवले. बिल्डिंगचा सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आलेला सिक्युरिटी गार्ड, लिफ्ट ऑपरेटर, प्लंबर आणि पाणी सप्लाय करणाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

 

First Published on: July 20, 2018 4:34 PM
Exit mobile version