आंध्र प्रदेशच्या माजी विधानसभा अध्यक्षांनी केली आत्महत्या

आंध्र प्रदेशच्या माजी विधानसभा अध्यक्षांनी केली आत्महत्या

टीडीपीचे ज्येष्ठ नेते कोडेला प्रसाद राव यांची आत्महत्या

आंध्र प्रदेशचे माजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिव प्रसाद राव यांनी आत्महत्या केल्याचे खळबळजनक वृत्त समोर येत आहे. सोमवारी सकाळी आपल्या निवासस्थानी पंख्याला गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, कोडेला ही काही दिवसांपासून आजारी होते. तसेच ते तणावाखाली असल्यामुळे त्यांचा इलाज सुरु होता. कोडेला हे तेलगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.

२०१४ साली आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाला तेव्हा कोडेला हा विधानसभेचे अध्यक्ष बनले होते. नारसोराओपेट या मतदारसंघातून ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. आंध्रप्रदेशचे गृहमंत्री आणि पंचायत राजमंत्री म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला होता. कोडेला यांनी १९८३ साली राजकारणात प्रवेश केला होता.

विधानसभेतील टेबल-खुर्च्या आपल्या मुलाच्या शोरुमसाठी वापरल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांची चौकशी देखील झाली होती.

First Published on: September 16, 2019 2:44 PM
Exit mobile version