लालू प्रसाद यांना डिस्चार्ज; ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे कोर्टाचे आदेश

लालू प्रसाद यांना डिस्चार्ज; ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे कोर्टाचे आदेश

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना मुंबईतील एशियन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ५ दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या अगोदर देखील लालू प्रसाद हे देखील उपचार घेण्यासाठी आले होते. मुंबईहून निघालेले लालू शनिवारी दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी पटणा पोहोचले. शुक्रवारी झारखंड हायकोर्टाने लालू प्रसाद यादव यांनी तीन महिने जामीनासाठी केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावत त्यांना ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते.

अडीच महिने औषधं घ्यावी लागणार

लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. मात्र पुढील काही महिने औषधं सुरू राहणार आहेत. २४ ऑगस्ट रोजी लालूप्रसाद यांना एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. मात्र, पुढचे अडीच महिने त्यांना औषधं घ्यावी लागणार आहेत. तसेच त्यांना पुढचे काही महिने दिलेला व्यायाम करावा लागणार आहे, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.

चारा घोटाळ्यात आढळले दोषी

पशुखाद्य गैरव्यवहारातील (चारा घोटाळा) चौथ्या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच ३० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला. दोन दशकांपूर्वी डुमकाच्या कोशागारातून ३.७६ कोटी रुपये काढल्याचा आरोप लालूप्रसाद तसेच अन्य १८ जणांवर होता. १९९०च्या दशकात डुमका ट्रेझरीमधून गैरमार्गाने ३.१३ कोटी रुपये काढल्याप्रकरणी न्यायाधीशांनी लालू आणि इतर १७ जणांना दोषी ठरविले, तर मिश्रा आणि इतर ११ जणांची आरोपातून मुक्तता केली. सध्या लालू शिक्षा भोगत आहेत.

राबडी देवी यांची चौकशी सुरू

नोटबंदीच्या काळात सहकारी बॅंकेत १० लाख रुपये जमा करण्याच्या आरोपावरून लालू प्रसाद यादव यांची पत्नी व माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक त्यांच्या घरी पोहचले. मागील दीड वर्षापासून या सहकारी बॅंकेची सीबीआय चौकशी सुरू आहे.

इतके वेळा लालू प्रसाद यादव होते रुग्णालयात

लालू प्रसाद यांच्यावर २७ ऑगस्ट २०१४ मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना १३ सप्टेंबर २०१४ ला डिस्चार्ज देण्यात आला़.

त्यानंतर २३ मे २०१८ ला त्यांना पुन्हा प्रकृती अस्वास्थाच्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना ४ जूनला डिस्चार्ज देण्यात आला.

त्याच महिन्यात २६ जूनला पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि ९ जुलैला डिस्चार्ज देण्यात आला.

तर, या महिन्यात ६ ऑगस्ट या दिवशी लालू प्रसाद यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, २५ ऑगस्ट या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

First Published on: August 25, 2018 4:42 PM
Exit mobile version