तामिळनाडूमध्ये माजी नगरसेवकाने महिलेला केली बेदम मारहाण

तामिळनाडूमध्ये माजी नगरसेवकाने महिलेला केली बेदम मारहाण

द्रमुकच्या माजी नगरसेवक सेल्वकुमार

तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. द्रमुकच्या माजी नगरसेवकाने एका महिलेला बेदम मारहाण केली आहे. तामिळनाडूच्या पेरम्बलुर येथे ही घटना घडली आहे. द्रमुकचे माजी नगरसेवक सेल्वकुमार याने २५ मे २०१८ ला एका महिलेला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली होती. मारहाणीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पेरम्बलुर येथे एका ब्युटीपार्लरमध्ये घुसून या माजी नगरसेवकाने महिलेला मारहाण केली होती. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पार्लरमध्ये उपस्थित असलेल्या काही महिला सेल्वकुमारला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र संतप्त दिसत असलेल्या सेल्वकुमार याने शिविगाळ करत महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण केली. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर द्रमुकमधून देखील या राक्षस माजी नगरसेवकाची हाकालपट्टी करण्यात आली.

First Published on: September 13, 2018 5:05 PM
Exit mobile version