‘राहुल गांधींचे कार्यक्रम फक्त महिला कॉलेजमध्येच, महिलांनो सावध व्हा’

‘राहुल गांधींचे कार्यक्रम फक्त महिला कॉलेजमध्येच, महिलांनो सावध व्हा’

चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूकीचा प्रचार सुरू आहे. यावेळी नेत्यांकडून अनेक आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. केरळचे माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपमानजनक भाष्य केलं आहे. राहुल गांधी यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली. सोमवारी उडुंबचोला येथे एमएम मणी यांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी महिलांना राहुल गांधींपासून सावध रहाण्याचं आवाहन केलं.

मुलींच्या कॉलेजमध्ये जाणं हा राहुल गांधी यांचा निवडणूक प्रचार आहे. ते तिथे जाऊन मुलींना वाकायला शिकवेल. माझ्या प्रिय मुलांनो त्यांच्यासमोर नतमस्तक होऊ नका, सरळ उभे रहा… ते विवाहित नाही, असं अपमानजनक आणि वादग्रस्त विधान जॉर्ज यांनी केलं. महिलांनी राहुल गांधींपासून सावध राहिलं पाहिजे. ते मुलींना फक्त स्नायू वाकवायला शिकवतील. काँग्रेस नेते अविवाहित संकट आहे, असं जॉर्ज म्हणाले.

जॉयस जॉर्ज यांच्या वक्तव्यावर मंत्री आणि उमेदवार एमएम मणी हसताना दिसले. जॉर्ज यांच्या वक्तव्याचा केरळ काँग्रेसने निषेध केला आहे. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ट्विट करत काँग्रेसने जॉयस यांच्या विधानाचा निषेध केला आहे. विधानसभा निवडणुकीत सीपीआयएमला पराभवाची जाणीव झाली आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते चेन्निथला यांनी माजी खासदाराच्या टीकेला महिला आणि राहुल गांधींचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

First Published on: March 30, 2021 7:06 PM
Exit mobile version