माजी पंतप्रधान Manmohan Singh यांची तब्येत बिघडली, AIIMSमध्ये केले दाखल

माजी पंतप्रधान Manmohan Singh यांची तब्येत बिघडली, AIIMSमध्ये केले दाखल

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ताप आल्यामुळे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) दिल्लीत दाखल करण्यात आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आला होता आणि आज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून चिंता करण्याचे गरज नाही आहे, असे सांगण्यात आले आहे. (Former Prime Minister Dr. Manmohan Singh admitted in aiims delhi)

दरम्यान याच वर्षी मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली होती. १९ एप्रिलला कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सिंग यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २९ एप्रिलला मनमोहन सिंग यांनी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. मनमोहन सिंग यांनी ४ मार्च आणि ३ एप्रिलला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

मनमोहन सिंग ८८ वर्षांचे आहे. त्यांना मुधमेहाचा आजार आहे. मनमोहन सिंग यांच्यावर दोन बायपास सर्जरी झाल्या आहेत. त्यांची पहिली सर्जरी १९९० साली युकेमध्ये झाली होती. तर २००९ मध्ये एम्स रुग्णालयात दुसरी सर्जरी करण्यात आली होती. गेल्या वर्षी नवीन औषध घेतल्याने रिअॅक्शन आणि ताप आल्यामुळे मनमोहन सिंग यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. बऱ्याच दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राजस्थानचे राज्यसभा सदस्य आहेत. मनमोहन सिंग २००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान होते. भारताचे १४वे पंतप्रधान सिंग होते.

First Published on: October 13, 2021 7:43 PM
Exit mobile version