संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन

संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन

कोफी अन्नान

संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव आणि शांततेचे नोबेल मिळालेल्या कोफी अन्नान यांचे आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. घाना या देशाचे नागरिक असलेल्या कोफी अन्नान यांनी जगभर शांततेचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. अन्नान यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिव पदी दोन वेळा निवड झाली. १९९७ ते २००६ दरम्यान दोन वेळा ते महासचिव झाले होते. युद्धांच्या गर्तेत अडकलेल्या देशांमध्ये अन्नान यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केले. युद्ध थांबवण्यासाठी अन्नान यांनी जागतिक स्तरावर विशेष प्रयत्न केले. गेल्या काही महिन्यांपासून अन्नान रोहिंग्या आणि सीरियामधील शरणार्थींसाठी काम करत होते. सीरियामधील शरणार्थींसाठी अन्नान यांनी नुकतीच सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांची भेट घेतली होती.

अन्नान यांच्याविषयी

कोफी अन्नान यांना २००१ साली शांततेचे नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. १९६२ मध्ये अन्नान यांनी जागतित आरोग्य संघटनेसाठी (WHO) काम केले. १९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी अद्दीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेसाठी काम केले. जगभरातली गरिबी नष्ट व्हावी अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी गरीबांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यासाठी काम केले. समाजातील वंचित घटकांकडे जगाचे लक्ष वेधण्याचे कार्य केले.

First Published on: August 18, 2018 3:42 PM
Exit mobile version