Video : सिंहगडावरुन मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट

Video : सिंहगडावरुन मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट

सिंहगडावरुन मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने एक अजब निर्णय घेऊन गड-किल्ल्यांवरचं पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. राज्यातल्या गड-किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. या निर्णयामुळे बराद वाद निर्माण झाला होता. सध्या हा वाद शांत झाला असला तरी देखील या निर्णयाला होणारा विरोध कमी होताना दिसत नाही. एका दूर्गप्रेमी तरुणीने या निर्णयाचा विरोध करण्यासाठी सिंहगड किल्ल्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट करुन त्याचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

फेसबुकवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. राज्यातल्या गड-किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये केल्याप्रकरणावरुन या तरुणीने निषेध व्यक्त केला आहे. गडकिल्ले देण्यापेक्षा तुमचा वर्षा बंगला त्या असं महणत तिया तरुणीने संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, फेसबुकवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पूजा झोळे या तरुणीने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. मुळची करमाळ्याची असणारी पूजा ही पुण्यामध्ये शिक्षण घेत असून ती गडकिल्ले संवर्धन आणि इतर अनेक सामाजिक विषयांवर फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त होते, असे तिच्या टाइमलाइनवरुन दिसते. पूजाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तिने राज्यातील किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

काय म्हणाली तरुणी?

‘शिवाजी महाराजांनी पराक्रमाने गडकिल्ले कमावले. ज्या गडकिल्ल्यांवर आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले आहे. स्वराज्य निर्माण केले, असे किल्ले हे फडणवीस सरकार लग्न समारंभासाठी आणि हॉटेलसाठी भाड्याने द्यायला लागले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? काय कळणार आहेत त्या शनिवारवाड्याला, या रायगडाच्या आणि सिंहगडाच्या वेदना? फडणवीस साहेब तुम्हाला बायका नाचवायच्या असतील तर तुमच्या वर्षा बंगल्यावर नाचवा. तुमच्या शनिवारवाड्यावर नाचवा. तुमचा हा निर्णय बदला. हा तर डेमो आहे’, अशा शब्दांमध्ये या तरुणीने सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.


हेही वाचा – उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार; ट्विटरवरून केली अधिकृत घोषणा


First Published on: September 13, 2019 4:42 PM
Exit mobile version